शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

अशोका बिल्डकॉन’वर प्राप्तीकर खात्याचा छापा

By admin | Updated: April 5, 2016 22:11 IST

अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका येथे मंगळवारी सकाळी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले़

तीन पथकांची कारवाई : कार्यालय, निवासस्थान, टोलनाक्याची झडतीनाशिक : अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका येथे मंगळवारी सकाळी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले़ सुरवातीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे मारल्याचे वृत्त होते, मात्र ईडीचा या छाप्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे कार्यालय, संचालक अशोक कटारिया यांचे गंगापूर रोडवरील ‘अंशुमान’ व पिंपळगाव बसवंतजवळील ‘पीएनजी टोलवे’ येथे एकाच वेळी छापा टाकला़ त्यात अधिकाऱ्यांनी अशोका बिल्डकॉनने केलेली कामे त्यासाठीचे पैशांचे व्यवहार आदींबाबतच्या फाईल्स व रेकॉर्ड तपासल्याचे समजते. प्रत्येक पथकामध्ये सात ते आठ कर्मचाऱ्यांचा समावेश होता़ सकाळपासून सुरू झालेले चौकशीचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते़ त्यापैकी पीएनजी टोलवेचे काम लवकर संपले तर कटारिया यांचे निवासस्थान व कार्यालय येथील चौकशी उशिरापर्यंत सुरू होती़ कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा त्यांची मदतही घेण्यात आली नव्हती़खा. किरीट सोमय्या यांनी मात्र, तपास यंत्रणांकडे मी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय व प्राप्तीकर विभागाची संयुक्त बैठक होवून हा छापा टाकण्यात आला आहे. कारवाई सुरू असल्यामुळे याबाबत बोलणे उचित होणार नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)