शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सुपरस्प्रेडर ठरवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर भारतीयांचा घोर अपमान, सचिन सावंतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:25 IST

Sachin Sawant : देशाचे पंतप्रधान या नात्याने संकटकाळात नागरिकांना मदत करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, असे सचिन सावंत म्हणाले. 

मुंबई : कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानीपद्धतीने लॉकडाऊन लावून करोडो लोकांचे हाल केले. कोरोनाच्या गंभीर संकटात मुंबईतील लाखो उत्तर भारतीय नागरिकांना काँग्रेसने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने घरी पाठवले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच उत्तर भारतीयांना कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरवून त्यांचा घोर अपमान केला. मुंबई महानगरपालिका व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला या अपमानाची भरपाई करावी लागेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, दुर्दैवी व आपल्याच देशाच्या नागरिकांचा अपमान करणारे आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर मुंबईतील उत्तर भारतीय नेते गप्प का आहेत? उत्तर भारतीय लोकांबद्दल मोदींच्या मनात किती प्रेम आहे, हे या अपमानातून त्यांना दिसले असेलच? या घोर अपमानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसला बदनाम करण्याच्या नादात पंतप्रधान मोदींनी आपल्याचा देशाच्या नागरिकांना बदनाम केले. 

कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा सामना देश करत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपा काढल्या. लहरी व मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन लावून करोडो लोकांना मोठ्या संकटात ढकलले. या संकट काळात काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार मुंबईतील उत्तर भारतीय बांधवांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली. वाहतुकीची सुविधा नसतानाही रेल्वे, बसच्या माध्यमातून आपल्या राज्यात जाऊ पाहणाऱ्या लाखो परप्रांतीय नागरिकांना काँग्रेसने सुविधा पुरवली व त्यांच्या राज्यात पाठवले. देशाचे पंतप्रधान या नात्याने संकटकाळात नागरिकांना मदत करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, असे सचिन सावंत म्हणाले. 

याचबरोबर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नमस्ते करताना किंवा मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊन केला नाही तेव्हा कोरोना पसरला नाही. ट्रेनही काँग्रेसने चालवली? पीयूष गोयल थाळ्या वाजवत होते का? गुजरातमधून गेलेले मजूर कोरोना पसरवत नव्हते. फक्त महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजुरांनी कोरोना पसरवला का? अशी प्रश्नांची सरबत्ती सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर केली. 

मोदी सरकारने कोट्यवधी कामगारांना वाऱ्यावर सोडले म्हणून काँग्रेसने गरीब कामगारांच्या तिकिटांसाठी पैसे दिले. असहाय्यांना मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही शिवरायांची शिकवण आहे. म्हणून काँग्रेसने केलेल्या कर्तव्य पालनाचा आम्हाला अभिमान आहे. उत्तर भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या अपमान विसरणार नाहीत व त्यांनी केलेल्या अपमानाची सव्याज परतफेड निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून करून देतील अशी अपेक्षा आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी