शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अभिमान गीताचे सातवे कडवे कापल्याने गदारोळ, विधानसभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:02 IST

मराठी अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळून आज ते विधानभवन प्रांगणात गायले गेल्याने मराठी भाषा गौरव दिनीच मराठी अभिमान गीताची गळचेपी झाली, असा आरोप करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज एक वेळा तहकूब केले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी अभिमान गीतातील शेवटचे कडवे वगळून आज ते विधानभवन प्रांगणात गायले गेल्याने मराठी भाषा गौरव दिनीच मराठी अभिमान गीताची गळचेपी झाली, असा आरोप करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. या गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज एक वेळा तहकूब केले.विधानभवन प्रांगणात आयोजित कार्यक्रमात संगीतकार कौशल इनामदार आणि त्याच्या चमूने कविवर्य सुरेश भट यांचे ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी...’ हे मराठी अभिमान गीत गायले; पण ते सहा कडव्यांचेच होते. त्यातील,पाहुणे जरी असंख्य पोसते मराठीआपुल्या घरात हाल सोसते मराठीहे असे कितीक खेळ पाहते मराठीशेवटी मदांध तख्त फोडते मराठीहे सातवे कडवे त्यांनी गायले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आदींनी हा मुद्दा उपस्थित केला.कविवर्य सुरेश भट यांच्या रूपगंधा काव्यसंग्रहाच्या शेवटच्या आवृत्तीत मराठी भाषेच्या अभिमान गीताची सहाच कडवी प्रकाशित करण्यात आली आहेत. सातवे कडवे हे त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते पण ते त्यांनी स्वत:ही ‘रूपगंधा’मध्ये समाविष्ट केलेले नव्हते, असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. या मुद्द्यावरून जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी तर विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी शासनाने मराठी भाषेच्या विकास प्रक्रियेस अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करीत विधानसभा अध्यक्षांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि या भाषेच्या संवर्धनासाठी अविरतपणे योगदान देणाºया सर्व साहित्यिकांचे दोन्ही सभागृहांनी ठरावाद्वारे अभिनंदन केले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी लागणारे पुरावे गोळा करण्यात आले असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच, अशी ग्वाही शिक्षणमंत्री तावडे यांनी दिली.मराठी भाषा दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभाग व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, मराठी अभिमान गीत गाऊन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध गायक कौशल इनामदार आणि चमूने मराठी अभिमान गीताचे मान्यवरांसमवेत समूह गायन केले.ही तर मराठीची गळचेपी-मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी इंग्रजीतून टिप्पणी टाकतात. मुख्यमंत्री अनेकदा हिंदी, इंग्रजीतून बोलतात. राज्यात मराठीची गळचेपी चालू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018