पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या एक महिन्यात तब्बल १ हजार ९२९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील ३० गुन्हेगारांचा समावेश आहे. यासोबतच एकूण ६० जणांना तडीपार करण्यात आले असून, दोन टोळ्यांविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, याकरिता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद यांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Updated: February 16, 2017 17:08 IST