शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Birth Certificate: राष्ट्रपती सुटले, पंतप्रधान अटकले; जन्म दाखल्यासाठी पालकाचे खेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:11 IST

Child names President, Prime minister: का दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले. तर महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क  उमरगा (जि. उस्मानाबाद) : होय, हे खरंय ! पंतप्रधानांचा जन्म दाखला लालफितीत अडकून पडलाय. त्याचे झाले असे, चिंचोली (भु.) येथील एका दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले. तर महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला. मात्र, पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्याचे सांगत त्याचा जन्म दाखला लटकून ठेवण्यात आला आहे.

चिंचोली भु. (जि. उस्मानाबाद) येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधार कार्डही त्यांनी बनविले. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (जि.सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले. 

या बाळाचे नाव त्यांनी रिवाजाप्रमाणे बारसे घालून ‘पंतप्रधान’ असे ठेवले. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता चौधरी यांनी जन्म दाखला मिळण्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी अर्ज सादर केला. परंतु ‘पंतप्रधान’ हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे, याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी आरोग्य केंद्राने सोलापूरच्या जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले. यास आता महिना उलटून गेला तरी ना मार्गदर्शन मिळाले, ना जन्म दाखला. इकडे पंतप्रधानांचे पालक दत्ता चौधरी मात्र, सातत्याने आरोग्य केंद्रात खेटे घालत आहेत. 

माझ्या पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म दाखला मिळाला आहे. या नावाने आधार कार्डही बनवून घेतले आहे; परंतु दुसऱ्या मुलाचे ‘पंतप्रधान’ हे नाव संविधानिक असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे याबाबत आता मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. याबाबत काहीच ठोस निर्णय कोणी घेईना. सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत.        - दत्ता चौधरी, पालक