शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:09 IST

दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल

मनोज मोघे  

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी असताना दुसरीकडे निवडणूक आयोगानेही जय्यत तयारी सुरू केली आहे.  राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे १ लाख मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल झाल्या आहेत. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे या ईव्हीएम सोपविण्यात आल्या असून, आता प्राथमिक स्तरावर राज्य निवडणूक आयोगाने त्याची चाचणीही सुरू केली आहे.

सध्या राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून हालचाली सुरू आहेत. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ २६ मे २०२४ रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवी लोकसभा अस्तित्वात येईल. या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचे राज्य निवडणूक आयाेगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. 

राज्यात सुमारे एक लाख मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट बॅलेट युनिट (ईव्हीएम)ची आवश्यकता असते. सध्या राज्याकडे पूर्णत: सुस्थितीत असलेली ६१ हजार बॅलेट युनिट आहेत. नवीन १ लाख ९२ हजार बॅलेट युनिट घेण्यात आली आहेत. अशी एकूण २ लाख ५३ हजार बॅलेट युनिट राज्याकडे आहेत.  जुनी २६ हजार सेंट्रल युनिट आहेत. नवीन १ लाख २२ हजार सेंट्रल युनिट घेण्यात आली आहेत. एकूण एक लाख ४८ हजार सेंट्रल युनिट सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे २२ हजार जुनी सुस्थितीतील व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. १.३५ लाख  नवीन व्हीव्हीपॅट मशिन घेण्यात आल्या. १.५७ लाख एकूण युनिट निवडणुकीसाठी तयार ठेवण्यात आली आहेत. 

अशी होते तपासणी  ‘भेल’चे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, निवडणूक अधिकारी,  राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमोर या सर्व ईव्हीएमची चाचणी करण्यात येत आहे. त्यांच्यासमोरच या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते मशिन सील केले जाते. सध्या २६ जिल्ह्यांतील मशिनची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे. पुढच्या दोन तपासण्या मतदान जवळ आल्यानंतर करण्यात येतात. 

विधानसभा निवडणूक एकत्र झाल्यास दुप्पट मशिन लागणारविधानसभेचा कार्यकाळ २५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपत आहे. केंद्र सरकारने लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घ्यायची तयारी करण्यास सांगितल्यास लोकसभेसाठी लागणाऱ्या यंत्रणेच्या दुप्पट यंत्रणा राबवावी लागणार आहे. असे झाल्यास अन्य राज्यांतून यंत्रे मागवावी लागतील. केंद्रातून तसे ठरल्यास पुढील दोन महिन्यांत त्याची तयारी करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूक