शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी ठाकरे गटाची तयारी, १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 08:42 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपसह शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या १० नेत्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी दहा नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यामध्ये खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्यासह आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व नेत्यांवर वेगवेगळ्या विभागाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह, नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अरविंद सावंत पश्चिम विदर्भ, तर भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतले जाणार आहे. तसेच,  जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौरा आणि जाहीर सभांचे नियोजन सुद्धा लवकर जाहीर केले जाणार आहे. 

कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी?

- खासदार संजय राऊत यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी चिंचवड, मावळ) मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- अनंत गीते यांच्या खांद्यावर कोकण (रायगड) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण ) मतदारसंघात पक्षवाढीसाठी तसेच निवडणुकीची जबाबदारी पार पाडणार आहे.

- माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. खैरे संभाजीनगर, जालना लोकसभा मतदारसंघात काम पाहणार आहे.

- खासदार अरविंद सावंत यांच्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशिम, वर्धा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे काम अरविंद सावंत पाहणार आहे.

- खासदार अनिल देसाई यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल देसाई हे सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी मतदारसंघात काम पाहणार आहे.

- आमदार सुनील प्रभू मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूर धाराशीव, लातूर, बीड लोकसभेसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- खासदार विनायक राऊत यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अरविंद सावंत हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीवर भर देणार आहे.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने खासदार राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राजन विचारे हे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतील.

- आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना