शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

परवानगीच्या प्रतीक्षेत निम्म्या मंडळांची उत्सवाला तयारी

By admin | Updated: September 1, 2016 22:28 IST

सण-उत्सव राजकीय पक्षांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - आगामी महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी कमी अवधी असल्याने सण-उत्सव राजकीय पक्षांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे गल्लोगल्ली सार्वजनिक मंडळांची मंडप विनापरवानगी थाटली जात असताना नगरसेवक मौनीबाबा बनले आहेत. प्रत्यक्षात १२ हजाराच्या आसपास मंडळं असताना पालिकेकडे मात्र २० टक्केच मंडळांची अर्ज आली आहेत.गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईतील बहुतेक रस्त्यांवर मंडपं सजली आहेत़ सजावटीसाठी वेळ मिळावा याकरिता काही मंडळांनी पंधरवड्याआधीच गणेश मूर्ती मंडपात आणली आहे़ मात्र अद्यापही ११३८ सार्वजनिक मंडळं मंडपाच्या प्रतीक्षेत आहेत़ पोलिस आणि पालिकेच्या माध्यमातून हिरवा कंदिल मिळत नसल्याने अनेक मंडळं परवानाविनाच उत्सवाच्या तयारीला लागले आहेत़मुंबईत दरवर्षी सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आपले मंडप थाटतात़ तंंबूसाठी या मंडळांनी खोदलेले रस्ते भरण्यात येत नाहीत़ तर अनेक ठिकाणी रस्ताच अडविला जातो़ यामुळे वाहतूक, पादचारी यांची गैरसोय होत असते़ या मंडळांना दंड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही़ त्यामुळेच मोठी सार्वजनिक मंडळं पालिकेच्या कारवार्इंना जुमानत नाही़.म्हणूनच यावर्षी परवानगी प्रक्रिया कठोर करण्यात आली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस उरले असूनही केवळ ४८० गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे़ उर्वरित १३१८ मंडळं पालिका आणि पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत़ आतापर्यंत पालिकेकडे आलेल्या २१७६ अर्जांपैकी ३७८ मंडळांनाच पालिकेची अधिकृत परवानगी मिळाली आहे.पोलिसांची परवानगी आवश्यकपूर्वी सुमारे दहा ते १२ हजार मंडळांना सरसकट मंडप बांधण्याची परवानगी मिळत होती़ मात्र गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने पादचारी व वाहतुकीला अडथळा येत असलेल्या मंडळांना परवानगी नाकारण्याचे आदेश दिले आहेत़ वाहतूक व स्थानिक पोलिसांची परवानगी मिळाल्यानंरच पालिकेच्या वॉर्डातून मंजुरी मिळते़ म्हणून वाहतूक पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सुमारे ११५० मंउळं खोळंबली आहेत़अर्ज केलेले मंडळ २१७६परवानगी दिलेले४८०परवानगी नाकारली३७८पोलिसांकडे प्रलंबित अर्ज ११५०पालिकेकडे प्रलंबित अर्ज १६८एकूण प्रलंबित१३१८