शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

संडे स्पेशल मुलाखत : '' जम्मू '' तील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्यास देणार प्राधान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 21:35 IST

’आजवर जम्मू  काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते...

’आजवर जम्मू  काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते. सध्या जम्मूच्या खो-यातील असंख्य तरुण रोजगाराकरिता भारताच्या कानाकोप-यात जात आहे. जम्मुत जे पिकते ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात आयएमएमच्या माध्यमातून केला जाणार आहे. यातून तेथील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्याकडे विशेष भर देण्यात येणार आहे. असे मत जम्मूच्या बोर्ड ऑफ गव्हर्नस ऑफ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मँनेजमेंटपदाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.’ 

1.जम्मूतील आपल्या कार्यक्षेत्राविषयी काय सांगाल?- आयआयएमच्या वतीने आता जम्मुतील वेगवेगळ्या भागांमध्ये नजीकच्या काळात सर्वेक्षण केले जाईल. त्यानुसार कुठल्या भागात नेमक्या कशास्वरुपाचे व्यवसाय उभारणीवर भर द्यावा लागेल याची कल्पना येईल. त्यानुसार सुरुवातीला पायाभुत सोयीसुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 200 एकरच्या जागेत आता कंपाऊडचे काम सध्या सुरु असून पुढील चार वर्षांच्या कालावधीत नवनवीन योजना प्रत्यक्षात आणण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. याच बरोबर शैक्षणिकदृष्ट्या युवकांमध्ये जागरुकता निर्माण करता येईल. व्यवस्थापन प्रशासनाव्दारे तरुणांना उद्योगजकतेचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करणे मुख्य उद्देश आहे. 

2. आपल्यापुढे कुठली आव्हाने असतील ?- काश्मिरच्या तुलनेत जम्मुतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुलनेने तितकासा आव्हानात्मक नाही. सध्या कश्मिरमध्ये जी परिस्थिती आहे ती जम्मुत जाणवत नाही. अर्थात यासगळ्यांचे आव्हान आहेच. जम्मुतील तरुणाईला आयआयएमपर्यंत घेऊन येण्याकरिता पुरेसे प्रयत्न करावे लागतील. त्यांच्याकरिता ही मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आयआयएमशी स्वत:ला जोडून घेणे महत्वाचे ठरणार आहे. भविष्यात या ठिकाणी आणखी नवीन कोर्सेस सुरु करायचे असून ते शेतीसंबंधी असणार आहेत. त्यात खासकरुन सफरचंदाच्या ब्रँण्डिंगवर भर दिला जाणार आहे. 

* जम्मुतील सफरचंद संपूर्ण भारतात प्रसिध्द आहेत. विविध देशांमध्ये त्याची निर्यात देखील होते. मात्र जम्मुतील तरुणाईला त्या व्यवसायातून जगभर पोहचविण्याकरिता संस्था प्रयत्न करणार आहे. बाजारपेठेचे सतत बदलत जाणारे स्वरुप बघता सफ रचंदाच्या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व मार्केटींगची जोड दिल्यास त्याचा फायदा तरुण व्यावसायिकांना होईल. असे वाटत असल्याची भावना कांबळे व्यक्त करतात. याचबरोबर तेथील कारागिरीला व्यवसायात परिवर्तीत करण्याकरिता आता नवीन पिढीला व्यवस्थापन व उदयोगधंद्याचा दृष्टीकोन समजून सांगावा लागेल. असेही ते म्हणाले. ............देशात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरु नये. दुसरं म्हणजे राज्यातील उदयोगक्षेत्रात बहुजन समाजातील व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग सर्वाधिक आहे. आपण लघु आणि मोठे उद्योगांना कच्च्या स्वरुपात भांडवल पुरविणा-यांचा अभ्यास केल्यास आपल्याला वस्तुस्थिती कळेल. मार्केटींग, सर्विस आणि टेÑड या तिन्ही क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा या वर्गाला होईल. याकरिता प्रयत्न सुरु आहेत.  - मिलिंद कांबळे 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीर