शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

प्रीती राठी प्रकरण - अंकुर पनवार दोषी; शिक्षेचा निर्णय आज

By admin | Updated: September 7, 2016 05:49 IST

प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने प्रीतीचा शेजारी अंकुर पनवार याला मंगळवारी दोषी ठरवले. अंकुरला कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी

मुंबई: प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने प्रीतीचा शेजारी अंकुर पनवार याला मंगळवारी दोषी ठरवले. अंकुरला कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, यासंदर्भात बुधवारी सरकारी वकील व बचावपक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर त्याच्या शिक्षेवर न्यायाधीश निर्णय घेतील. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. ए. एस. शेंडे यांनी अंकुर पनवारला भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या) आणि ३२६ (ब) (अ‍ॅसिड फेकणे) अंतर्गत मंगळवारी दोषी ठरवले.अंकुरचे कुटुंब प्रीतीच्या शेजारीच राहत होते. प्रीतीच्या करिअरचा चढता आलेख पाहून पनवार कुटुंबीय अंकुरला सतत हिणवत व ओरडत असत. प्रीतीच्या करिअरमुळे तिचा मत्सर करणाऱ्या अंकुरने प्रीती ज्या ट्रेनने मुंबईला येत होती ती ट्रेन पकडली. प्रीती २ मे २०१३ रोजी वांद्रे स्थानकावर उतरली. तिच्याबरोबर अंकुरही ट्रेनमधून उतरला. संधी मिळताच त्याने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले आणि दुसरी ट्रेन पकडून तो मुंबईतून पसार झाला. ‘दिल्लीला असतानाही अंकुर प्रीतीला मानसिक त्रास द्यायचा. एकदा त्याने विवाहाचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु, हा प्रस्ताव फेटाळला, असे खुद्द प्रीतीनेच रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्या एका मैत्रिणाला सांगितले होते. प्रीतीने त्याचा प्रस्ताव नाकारल्याने अंकुरने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. अ‍ॅसिडहल्ल्यानंतर प्रीतीची प्रकृती बिघडली. एक महिना तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची फुप्फुसे निकामी झाली होती. अखेरीस १ जून रोजी तिचा मृत्यू झाला. आतापर्यंत या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांनी ३७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने न्यायालयात सांगितले की, राठी वांद्रे टर्मिनसला उतरली त्या वेळी डोक्यावर पांढऱ्या रंगाची कॅप आणि चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला २० ते २५ वर्षांचा तरुण तिच्याजवळ आला. बॉक्समधून अ‍ॅसिडची बाटली काढली आणि त्यातील अ‍ॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकून तो फरार झाला. अंकुर पनवार याला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली. त्याच्यावर पोलिसांनी १,३२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रीती आणि अंकुर नवी दिल्लीच्या नरेलाच्या एकाच कॉलनीमध्ये राहत होते. अंकुरला नोकरी मिळता मिळत नव्हती तर प्रीतीला आयएनएस अश्विनी येथे लेफ्टनंट (नर्सिंग) म्हणून नोकरी मिळाली. तिचे यश पाहून अंकुरचे पालक ऊठसूट त्याला प्रीतीचे उदाहरण देऊन मानसिक त्रास देत होते. त्यामुळे अंकुरने तिचे करिअर संपवण्याचा निर्णय घेतला. प्रीतीचा चेहरा विद्रूप केला तर तिला नोकरीवर ठेवणार नाही, असा अंकुरचा समज होता. त्यामुळे त्याने प्रीतीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याचा निर्णय घेतला. भारतात अ‍ॅसिडहल्ल्याच्या सर्वाधिक केसेसभारतात अ‍ॅसिड हल्ल्याच्या सर्वाधिक केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. दरवर्षी जगात अ‍ॅसिड हल्ल्याच्या १५०० केसेस नोंदवण्यात येतात. त्यातील एक हजार केसेस केवळ भारतातच नोंदवण्यात येतात. २०१३मध्ये अ‍ॅसिडहल्ल्याचा समावेश फौजदारी गुन्हेगारीमध्ये केला. सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्ये बाजारात अ‍ॅसिड सहज उपलब्ध होऊ नये, यासाठी सरकारला आदेश दिला होता. तरीही बाजारात आजही अ‍ॅसिड सहजच उपलब्ध होत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ला केस. पनवारला कठोर शिक्षा देण्याची मागणी करणारपनवारने केलेला गुन्हा गंभीर आहे. त्याला कोणतीही दया दाखवण्यात येऊ नये, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती मी न्यायालयाला करणार आहे.- उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकीलअंकुरला फाशीची शिक्षा व्हावीतीन वर्षांनंतर आम्हाला न्याय मिळाला, याबद्दल मी आनंदी आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेल, अशी आशा आम्हाला आहे. आरोपी उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेला तरी आम्ही वरपर्यंत केस लढण्यास तयार आहोत.- अमर राठी, प्रीतीचे वडीलसीबीआयने केसचा तपास करावाआम्ही गरीब आहोत, त्यामुळे या केसमध्ये माझ्या मुलाला नाहक गोवण्यात आले आहे. सीबीआयने या केसचा तपास करावा, अशी विनंती आम्ही करणार आहोत.- कैलाश पनवार, अंकुर पनवारची आई