शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 5  ते 14 ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:44 IST

राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात  5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुंबई - राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात  5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे. 

यावेळई विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात. अशा वेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वत:चा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळं मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये. 5 ते 14 ऑक्टोबर याकाळात मुंबई आणि कोकण पट्ट्यातदेखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, आॅक्टोबर हीट जाणवू लागली

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, सोमवारी उत्तरकाशी, आग्रा, शिवपूर कल्याण, गांधीनगर, द्वारका या परिसरातून तो माघारी फिरला. येत्या ४८ तासांत तो गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून माघारी परतण्याची शक्यता आहे़ दरम्यान, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत कोकणात, म्हसाळा ११०, वैभववाडी ९०, लांजा ७०, संगमेश्वर, देवरुख ६०, देवगड ५०, मंडणगड, श्रीवर्धन ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ४०, गारगोटी, भुदरगड ३०, आजरा, पन्हाळा २० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यातील उदगीर ३० आणि विदर्भातील आमगाव, देवरी ५०, भामरागड, झरीजामनी ४० मिमी पाऊस झाला.मान्सूनची माघार सुरू झाली असतानाच वातावरणातील आर्द्रता मात्र कायम असल्याने उष्मा वाढला आहे़ त्यामुळे राज्यात अनेक शहरांमध्ये आॅक्टोबर हीट जाणवू लागली आहे़ विदर्भातील अनेक शहरांतील कमाल तापमान ३४ ते ३६अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ पुण्यात रविवारी कमाल तापमान ३४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.