शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व कामांसाठी अधिकारी मोहिमेवर

By admin | Updated: May 7, 2017 06:48 IST

रस्ते आणि नाल्यांची सफाई या रखडलेल्या कामांनी पालिका प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी पावसाळापूर्व

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते आणि नाल्यांची सफाई या रखडलेल्या कामांनी पालिका प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी पावसाळापूर्व कामांचे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते आणि नालेसफाईच्या मोहिमेवर निघा, कार्यालयात न थांबता ही कामे वेळेवर होत असल्याची खातरजमा करण्यासाठी नियमित पाहणी करा, अशी ताकीदच आयुक्तांनी शनिवारी मासिक आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना दिली आहे.ठेकेदारांनी नालेसफाईकडे फिरवलेली पाठ आणि दगडखाणीवर बंदी असल्यामुळे खादीअभावी रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ३१ मेच्या डेडलाइनपूर्वी ही महत्त्वाची कामे होणे अवघड असल्याचे चित्र आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी आणि खड्डेनगरी होण्याची चिन्हे आहेत. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिवारी घेतली. ही मासिक आढावा बैठक दर महिन्याला घेण्यात येते. परंतु पावसाळापूर्व कामे हे या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे होते. या बैठकीत चार अतिरिक्त आयुक्त, सात परिमंडळांचे उप आयुक्त, २४ वॉर्डांचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.प्रत्येक विभागातील पावसाळापूर्व कामांची झाडाझडती आयुक्तांनी या वेळी घेतली. रस्ते आणि नाल्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या मंगळवारी आणि गुरुवारी आपापल्या विभागांमध्ये फिरण्याची सक्त ताकीद उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना दिली आहे. या पाहणी दौऱ्याला मोहिमेचे स्वरूप येण्यासाठी असे दौरे दर दोन दिवसांनी नियमित करावे, असेही अधिकाऱ्यांना ठणकाविण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना आपले वातानुकूलित दालन सोडून रणरणत्या उन्हात रस्त्यावर फिरावे लागणार आहे.असे मिळणार मोहिमेचे स्वरूप कडक उन्हाळ्यामुळे केबिनच्या बाहेर पाऊलही न ठेवणाऱ्या अधिकारीवर्गाला आता भर ऊन्हात रस्ते पाहणीसाठी घाम गाळावा लागणार आहे. येत्या मंगळवारी आणि गुरुवारी महापालिकेच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागस्तरीय साहाय्यक आयुक्त यांनी कार्यालयात न थांबता, कोणत्याही कार्यालयीन बैठकांना हजर न राहता, पूर्णवेळ त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व नाल्यांच्या कामांची पाहणी करावी. ही कामे ठरलेल्या वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या होतील याची खबरदारी घ्यावी, असे आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना बजावले. रस्ते व नाल्यांच्या कामांना मोहिमेचे स्वरूप यावे, यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दोन दिवसांनंतरदेखील सातत्याने या कामांचा आढावा घेत राहावा, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांवर रस्त्यांची जबाबदारी रस्त्यांची कामे ही प्रामुख्याने ‘प्रकल्प रस्ते’ आणि ‘प्राधान्यक्रम रस्ते’ या दोन प्रकारांत विभागण्यात आली आहेत. यापैकी प्रकल्प रस्त्यांची कामे ही वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या करून घेण्याची जबाबदारी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर प्राधान्यक्रम १ व २ अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची जबाबदारी संबंधित विभागाच्या साहाय्यक आयुक्तांवर असणार आहे.खडीची जबाबदारी ठेकेदारांवर दगडखाणींवर बंदी असल्यामुळे खडीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांचे काम रखडले आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठी मुंबईला खडीपुरवठा करणाऱ्या दगडखाणींवरील बंदी उठवण्याची विनंती महापालिकेने हरित लवादाकडे केली होती. दरम्यान, उरणवरून खडीचा पुरवठा मुंबईला होत आहे. मात्र मागणीपेक्षा पुरवठा कमीच असल्याने खडीसाठी तातडीची निविदा काढून आवश्यकतेनुसार त्याचा पुरवठा करावा, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. निविदेनुसार खडीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याने त्याचा खर्च व जबाबदारीवर खडीसाठी तातडीची निविदा काढण्यात येणार आहे. रस्त्यांच्या पावसाळापूर्व कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र नवी मुंबईतील दगडखाणींवर बंदी आल्याने ठेकेदारांना आता मुंबईबाहेरील दगडखाणींवर विसंबून राहावे लागणार आहे.रस्त्यांच्या पावसाळापूर्व कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र नवी मुंबईतील दगडखाणींवर बंदी आल्याने ठेकेदारांना आता मुंबईबाहेरील दगडखाणींवर विसंबून राहावे लागणार आहे.