शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“फडणवीसांना टार्गेट करणे हाच जरांगेंच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू”; भाजपा नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:58 IST

BJP Pravin Darekar News: विरोधी पक्षाचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत का, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत, त्यांचा अजेंडा जरांगेंमार्फत राबवला जात आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

BJP Pravin Darekar News: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत, तो डाव मी मोडणार अशा प्रकारचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट हाच आहे. अशा प्रकारची वक्तव्य करायला मनोज जरांगेंना कुणीतरी ब्रिफिंग देतेय का हे तपासण्याची गरज आहे, अशी टीका भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, आपले शस्त्र हत्यार म्हणून वापर होतो आहे का, याची तमाम मराठा समाजाला चिंता आहे. देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विश्वास आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले, टिकवले. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हिताच्या अनेक योजना, सवलती आणल्या. आताही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिले आहे. ते टिकवण्याची हमीही दिलेली आहे. सगेसोयरे बाबतीत मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. सगेसोयऱ्याच्या विषयावर चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु केवळ देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे, एकेरी बोलायचे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला.

विरोधी पक्ष बैठकीला आला नाही त्यावर बोलायचे नाही

मराठा समाज बरोबर आहे, म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारचे टार्गेट करणे योग्य नाही, हे जरांगेंनी समजून घेण्याची गरज आहे. महायुती सरकारने महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवताय की काय? विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवताय की काय? फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत, त्यांचा अजेंडा आपल्यामार्फत राबविला जातोय की काय? अशा प्रकारचा संशय येत आहे. जरांगेंनी केवळ आंदोलनाच्या विषयावर सरकार म्हणून बोलावे. केवळ देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. बाकी विषय बाजूला राहतात. विरोधी पक्षाबाबत बोलायचे नाही. विरोधी पक्ष बैठकीला आला नाही त्यावर बोलायचे नाही. महाराष्ट्रासमोर आणि जरांगे पाटील यांच्या समोर केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव प्रश्न आहे, असे त्यांच्या वक्तव्यातून वाटते, असे दरेकर म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र रक्तबंबाळ व्हावा, असा डाव असता तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीला सर्वपक्षीय बैठकीसाठी पुढाकार घेतला असता का? ते राज्याचे गृहमंत्री आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्यांचे आहे. ते राज्य रक्तरंजित कसे होऊ देतील. ते रक्तरंजित होऊ नये यासाठीच त्यांचा अट्टाहास आहे. गृहमंत्री म्हणून जरांगेंनी साथ देऊन शांततेत चर्चेच्या मार्गातून मराठा समाजाला न्याय द्यावा. उगाच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा चर्चेतून, समन्वयातून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी. हे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस