- श्रीकिशन काळे पुणे : वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला ड्रोनचे वेड लागले आणि तो आज केवळ २२ व्या वर्षीच आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन बनविणारा जागतिक वैज्ञानिक बनला आहे. तो ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करतो आणि आतापर्यंत ६०० ड्रोन तयार केले आहेत. आता तो अनेक संस्थांसोबत काम करत असून, ड्रोन बनविण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडलही मिळाले आहे. प्रताप एन. एम. असे त्याचे नाव असून, तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला होता. तेव्हा त्याने आपल्या यशाचा पट उलगडून सांगितला. कर्नाटक मधील निताकली या एका लहानशा गावातून शिक्षण घेत ड्रोनमध्ये ‘एकलव्य’ बनून आज तो जगासाठी ‘ड्रोन गुरू’ बनला आहे. प्रतापने स्वत:मधील कला जाणून या ड्रोनच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशातील गरूडाला पाहून ड्रोनबाबतची त्याची उत्सुकता वाढली. आपणही असे ड्रोन बनवू असे ठरवून तो कामाला लागला. सुरवातील ८८ वेळा तो यात फेल झाला. पण तरी त्याने जिद्द सोडली नाही. प्रयत्न करीत राहिला. ड्रोनला पैसे जमा करण्यासाठी तो एका ठिकाणी स्वच्छता करायचा. त्याचे त्याला २० रुपये मिळायचे. ते पैसे जमा करून अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांना ईमेल पाठवून ड्रोनबाबत माहिती विचारायचा. अशा प्रकारे शिकत शिकत प्रतापने ड्रोनवर प्रभुत्व मिळविले. स्वत:कडे आणि वडिलांकडे काहीच पैसे नव्हते. म्हणून ई-वेस्टपासून ड्रोनची कल्पना सुचल्याचे प्रताप सांगतो. कर्वेनगर येथील भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्क्टिटेक्ट फॉर वूमन येथे कार्यशाळेसाठी आले होते.
ई-वेस्ट पासून ६०० ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:00 IST
वयाच्या चौदाव्या वर्षी लागली गोडी; २२ व्या वर्षी १२८ देशातून आले निमंत्रण
ई-वेस्ट पासून ६०० ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'
ठळक मुद्देड्रोन बनविण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाले गोल्ड मेडलड्रोन वाचवतोय माणसांचे प्राण परदेशी जाण्यास लागणाऱ्या एका सहीसाठी ८ दिवस उपाशी...