शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले, कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:55 IST

दामले यांना ५०, तर प्रसाद कांबळी यांना ९ मते मिळाली. 

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांच्या गळ्यात पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता लागलेल्या नाट्य परिषद कार्यकारिणीच्या निवडणुकीची प्रक्रिया यशवंत नाट्यगृहामध्ये पार पडली. दामले यांना ५०, तर प्रसाद कांबळी यांना ९ मते मिळाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ६० सदस्यांनी १९ जणांच्या कार्यकारिणीची निवड केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ढोलताशाच्या तालावर गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांसह इतर रंगकर्मींनी आपला आनंद व्यक्त केला. नरेश गडेकर (प्रशासन) व भाऊसाहेब भोईर (उपक्रम) उपाध्यक्ष बनले आहेत. अजित भुरे प्रमुख कार्यवाह बनले असून, माजी सहकार्यवाह सतीश लोटके नव्या कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. 

आमची लढाई आज संपली. आता नवीन नियामक मंडळ आले आहे. या नियामक मंडळात आम्ही काम करू. इतक्या लवकर नवीन नियामक मंडळाकडून कोणत्याही अपेक्षा व्यक्त करता येणार नाहीत. चांगले काम करणाऱ्यांना आमचा १०० टक्के पाठिंबा असेल. नाट्य परिषदेसमोरील उरलेल्या कामांबाबत मी आणि नवीन अध्यक्ष चर्चा करू. सर्व माझेच असल्याने भविष्यात एकत्र कामही करू.- प्रसाद कांबळी, नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष 

मित्रमंडळींच्या आग्रहाखातर निवडणुकीला उभा राहिलो, निवडणूक लढवली आणि अध्यक्ष बनलो आहे. विजयाचा गुलाल उधळताना एक मोठी जबाबदारी आल्याचे भान आहे. यापूर्वीही नाटक आणि रंगकर्मींच्या हितासाठी काम केले. पण, आता मोठा कॅन्व्हास मिळाला आहे. तूर्तास परिषदेची कोणतीही कागदपत्रे पाहिली नसल्याने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहांवर सोलार यंत्रणा बसवणे, नाट्य परिषदेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तळागाळातील रंगकर्मींच्या समस्या सोडवणे, नाट्य परिषदेच्या संकुलाबाबतचा निर्णय घेणे आणि सर्व रंगकर्मींना सोबत घेऊन खेळीमेळीने काम करणे हे प्रथम उद्दिष्ट आहे.- प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष

नाट्य परिषदेचे नियामक मंडळ -अध्यक्ष : प्रशांत दामलेउपाध्यक्ष (प्रशासन) : नरेश गडेकरउपाध्यक्ष (उपक्रम) : भाऊसाहेब भोईरप्रमुख कार्यवाह : अजित भुरेकोषाध्यक्ष : सतीश लोटकेसहकार्यवाह : समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगेकार्यकारिणी सदस्य : विजय चौगुले, चंद्रकांत देसाई, संदीप पाटील, गिरीश महाजन, सविता मालपेकर, संजय रहाटे, दीपक रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजय साळुंखे, दीपा क्षीरसागर

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामलेmarathiमराठी