शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला'चा नंदूरबारपासून प्रारंभ; पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 6:17 PM

'राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत.'

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील बचत गटांसाठी आखलेल्या प्रज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ शनिवार, दि. १५ जून रोजी नंदूरबार येथे होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ होईल. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली.

१५ जून ते ३० आॅगस्ट दरम्यानच्या कालावधीत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. शुभारंभ कार्यक्रमात मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त नंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावळ, खासदार हीना गावित, आमदार विजयकुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

"राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुसरया टप्प्यात 'एक जिल्हा, एक वस्तू'ची क्लस्टर्स निर्मिती आणि तिसरया टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारांची उभारणी असे नियोजन आहे," अशी माहिती विजया रहाटकर यांनी दिली. 

या योजनेसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकर