शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

१ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल ,संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणात राज्यपालांकडून प्रशंसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:17 AM

सन २०२५ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी अमेरिकन डॉलर इतकी करण्यासाठी राज्य शासन अत्यंत दमदार पावले उचलत असल्याचे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणात सांगितले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सन २०२५ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी अमेरिकन डॉलर इतकी करण्यासाठी राज्य शासन अत्यंत दमदार पावले उचलत असल्याचे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणात सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.राज्यपाल म्हणाले-१ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, नवउद्यम यांसारख्या अनेक क्षेत्रातील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. संरक्षण, कृषी व अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, अंतराळ, लॉजिस्टिक्स, वित्त तंत्रज्ञान, अ‍ॅनिमेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या उद्योगांशी संबंधित धोरणे शासनाने स्वीकारली आहेत.विविध क्षेत्रांत केलेल्या भरीव गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचे स्थूल राज्य उत्पन्न ५.४ टक्क्यांहून ९.४ टक्के इतके वाढले आहे. महाराष्ट्राच्या उणे कृषी विकासाचा दर अधिक १२.५ टक्के इतका झाला आहे.२०१३-१४ मधील २९ हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढून, ती २०१७-१८ मध्ये ८३ हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. मागेल त्याला शेततळे, पंपसंचाचे विद्युतीकरण, जलयुक्त शिवार यांसारख्या माध्यमातून कृषी आणि संलग्न क्षेत्रातील मत्ता वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे.प्रधानमंत्री फसल बिमा योजना आणि किमान आधारभूत किंमत योजनेतून शेतीमाल खरेदी करून, अडचणीत असलेल्या शेतकºयांना संरक्षण देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून आतापर्यंत ५४.७२ लाख मान्यताप्राप्त खात्यांपैकी ४६.३५लाख खात्यांकरिता कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करण्यासाठीचा प्रोत्साहनाबाबतचा निधी संबंधित बँकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळांची स्थापना करण्याचा निर्णय, कौशल्य विकासासाठी केलेल्या करारांद्वारे १० लाख रोजगार, मागास विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान, वस्रोद्योग धोरण, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण, १ लाख कोटी रुपये खर्चाचे मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार योजनचे यश, नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कुपोषणाचे कमी झालेले प्रमाण, मातृत्व योजनेचा ६ लाख महिलांना दिलेला लाभ, कृषी पंपांच्या विद्युतीकरणाचा धडाका, सिंचन प्रकल्पांसाठी दिलेला मोठा निधी आदींचा उल्लेख करून, सरकारच्या विकासाभिमुखतेची राज्यपालांनी प्रशंसा केली.