शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभातरंजन उद्या निवृत्त, महासंचालकाचे आणखी एक पद काही काळ रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:18 IST

गृहरक्षक दलाचे महासमादेशक प्रभातरंजन ३१ आॅगस्टला सेवानिवृत्त होत असून रिक्त होणारे पद गणेशोत्सवानंतर भरले जाणार आहे.

जमीर काझीमुंबइ : गेल्या तेरा महिन्यापासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालका बरोबरच येत्या शुक्रवारपासून या दर्जाच्या पदामध्ये आणखी एकाने वाढ होणार आहे. गृहरक्षक दलाचे महासमादेशक प्रभातरंजन ३१ आॅगस्टला सेवानिवृत्त होत असून रिक्त होणारे पद गणेशोत्सवानंतर भरले जाणार आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र असलेले अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांना काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. सेवाजेष्ठता डावलल्याने उच्च न्यायालयात गेलेल्या होमगार्डचे अप्पर महासंचालक संजय पांडे यांच्याकडे विभागाचा पूर्णवेळ पदभार जावू नये, याची तजवीज केल्यानंतर तसेच बिपीन बिहारी सध्या राज्याची ‘लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर’ची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे साभाळीत असल्याने गणेशोत्सव व बकरी ईदच्या पाश्वभूमीवर त्यांना हलविले जाणार नसल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.गेल्यावर्षी एक आॅगस्टला सतीश माथूर यांनी पोलीस महासंचालकाची धुरा घेतल्यानंतर एसीबीला पूर्णवेळ महासंचालक देण्यात आलेला नाही. अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. प्रभातरंजन सेवानिवृत्त झाल्याने रिक्त होणाºया पदावर बिपीन बिहारी यांचे सेवाजेष्ठतेच्या आधारावर पदोन्नती निश्चित झाली आहे. गेल्यावर्षी गृह विभागाने एक अध्यादेश काढून संजय पांडे यांचा ९ वर्षापूर्वी तत्कालिन सरकारने मंजूर केलेला दोन वर्षे आठ महिन्याचा सेवा कालावधी अकार्य दिन केला. त्याविरुद्ध पांडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने सरकारला महासंचालक दर्जाचे एक पद रिक्त ठेवायचे आहे.मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे व ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंह यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांची नियुक्ती करायची झाल्यास आयुक्तपद पुन्हा ‘डाऊनग्रेड’ करावे लागणार आहे. मात्र दत्ता पडसलगीकर यांना ३१ जानेवारीला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सिंह यांचा ठाण्यात जवळपास अडीच वर्षे होवूनही त्यांना तेथून थेट मुंबईची धूरा सांभाळायाची असल्याने त्यांची अद्याप बदली केलेली नाही. त्यांच्या जाग्ोसाठी अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर,एटीएसचे अतुलचंद्र कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस