शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम ‘चांदर’मध्येही पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:51 IST

अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब आणि एक वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने पुण्यातील तालुका वेल्हे येथील अतिदुर्गम भागातील चांदर गावासह लगतच्या दोन वस्त्यांमध्ये वीज पोहचवली आहे.

मुंबई  - अवघ्या सात दिवसांत ६५ वीजखांब आणि एक वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने पुण्यातील तालुका वेल्हे येथील अतिदुर्गम भागातील चांदर गावासह लगतच्या दोन वस्त्यांमध्ये वीज पोहचवली आहे. केवळ एका विद्यार्थ्यांसाठी डोंगरदऱ्यातून अडीच-तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत विद्यार्जन करणारे शिक्षक रजनीकांत मेंढे यांच्यामुळे चांदरची माहिती प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जगाला मिळाली होती. त्या शाळेलाही नवी वीजजोडणी देण्यात आली आहे.चांदरमध्ये अठरा घरे आहेत. बाजूलाच टाकेवस्ती आणि डिगेवस्ती असा ४६ घरांचा परिसर आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहिती मिळाली. यावर येथे वीजपुरवठा करण्यासाठीचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार, २० एप्रिलला काम सुरु झाले. साठ कर्मचारी वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत वीजयंत्रणा उभारण्यासाठी काम सुरु होते. सलग सात दिवसांच्या कामानंतर २६ एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली; आणि येथे वीज पोहचली.वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे बबन सांगळे, तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील नथू कोकरे व तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, येथे वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे वीस लाख रुपये खर्च आला असून, चांदर गाव व दोन्ही वस्त्यांमध्ये ४६ पैकी बहुतांश घरे ही कुडाच्या मातीने लेपलेली असल्यामुळे वीजमीटर व सर्व्हीस वायर टाकण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे बबन सांगळे, तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील नथू कोकरे व तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र