शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

वीजनिर्मिती संकटात, भारनियमन वाढणार : चार दिवस पुरेल एवढाच कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 04:13 IST

महावितरणला वीजपुरवठा करणाºया राज्यातील १४ औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये चार-सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीजनिर्मिती कमालीची संकटात आली आहे. आधीच भारनियमनाचे चटके राज्याला बसत असताना वीजनिर्मितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

- यदु जोशी मुंबई : महावितरणला वीजपुरवठा करणा-या राज्यातील १४ औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये चार-सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीजनिर्मिती कमालीची संकटात आली आहे. आधीच भारनियमनाचे चटके राज्याला बसत असताना वीजनिर्मितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.वीज निर्मिती प्रकल्प आणि त्यांच्याकडे किती दिवसापुरता कोळसा साठा उपलब्ध आहे त्याची आकडेवारी अशी - अमरावती ६, भुसावळ ३, बुटीबोरी १, चंद्रपूर १०, डहाणू २, धारीवाल ०, जीएमआर वरोरा ५, खापरखेडा ८, कोराडी ४, मौदा ०, नाशिक ६, पारस ३, परळी ४, तिरोडा १. या प्रकल्पांमध्ये महानिर्मिती आणि खासगी अशा दोन्हींचे वीज प्रकल्प आहेत. येत्या दोन-चार दिवसांत कोळसा मिळाला नाही, तर वीजनिर्मितीत घट होणार असल्याने वीजभारनियमन वाढण्याची शक्यता आहे.वीजभारनियमनामुळे महाविरतण आणि महानिर्मितीमध्ये एकमेकांवर आरोप करणे सुरू झाले आहे. कोळसासाठ्याचे नियोजन महानिर्मितीने नीट केले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे; तर महावितरणने विजेच्या गरजेबाबत अद्ययावत आणि अचूक माहिती दिली नसल्याचे महानिर्मितीचे अधिकारी सांगत आहेत. कोळसा कंपन्यांकडून कोळशाचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून तत्काळ कोळसा पाठविण्याची विनंती केली आहे. महावितरणने आज खुल्या बाजारातून ४०० मेगावॅट वीज विकत घेत भारनियमनावर मात करण्याचा प्रयत्न केला.भारनियमनामुळे कर्जमाफीचे आॅनलाइन फॉर्म अडचणीतराज्याच्या अनेक भागांत वीज भारनियमन होत असल्याने कर्जमाफीसाठी शेतकरी आॅनलाइन अर्ज भरू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. १५ सप्टेंबर ही सदर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढविली नाही, तर अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार