शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

मॅरेथॉन आणि गणेशोत्सवावर खड्ड्यांचे सावट

By admin | Updated: August 23, 2016 03:29 IST

येत्या रविवारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा असून पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे.

ठाणे : येत्या रविवारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा असून पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु ठाणे शहरात मॅरेथॉनच्या मार्गासह शहराच्या इतर भागांतही रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा आणि बाप्पांचे आगमन हे यंदाही या खड्ड्यांतूनच होणार असे चित्र आहे. ही अवस्था असताना पालिकेच्या रेकॉर्डवर केवळ १४० खड्डे शहरात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यंदा पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा पालिकेचा दावा सध्या फोल ठरला आहे. पावसाची अडचण सांगून ते बुजवण्यास अडचण होत असल्याचे मत पालिकेकडून व्यक्त केले जात होते. परंतु, दुसरीकडे ते बुजवूनदेखील पुन्हा त्याचत्याच भागात खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर त्यांची संख्याही अधिक आहे. घोडबंदर भागातील सर्व्हिस रोडदेखील खड्ड्यांनी व्यापला आहे. खड्डे तत्काळ बुजवून ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक स्वरूपाची जेट पॅचर ही यंत्रणादेखील वापरली. परंतु, ती फोल ठरली आहे. एकूणच पालिकेने पावसाळ्यापूर्वी जो दावा केला होता, तो दावा अक्षरश: फोल ठरला आहे.दरम्यान, आता येत्या रविवारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठाण्यात रंगणार आहे. मागील वर्षीही मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांना खड्ड्यांचा अडथळा पार करावा लागल्याने काहींना अपेक्षित यशापासून दूर राहावे लागले होते. तर, गणेशोत्सवाचे आगमनदेखील असेच झाले होते. असे असताना आता येत्या रविवारी २७ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठाण्यात रंगणार आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. परंतु, अद्यापही ते बुजवण्यास वेग काही वाढलेला नाही. त्यात मागील काही दिवस कमी असलेला पावसाचा जोर सोमवारपासून पुन्हा वाढल्याने बुजवलेले खड्डे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.>मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावरील सर्व कामे लवकर पूर्ण कराठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या मार्गाची पाहणी सोमवारी महापौर संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत केली. राज्यपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते सुस्थितीत असून काही ठिकाणी असलेले खड्डे भरणे व इतर सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यास सभागृह नेत्या अनिता गौरी, नगरसेवक नरेश मणेरा, नगरअभियंता रतन अवसरमल उपस्थित होते. तांत्रिक समितीचे ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक आहेर तसेच सहायक पोलीस आयुक्त साहेबराव गीते, पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे उपस्थित होते.