शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

खड्डे दुरुस्ती रखडलेलीच

By admin | Updated: November 4, 2016 00:46 IST

डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे : पावसाळा संपल्यानंतर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वी तात्पुरती डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा संपल्यानंतर खड्ड्यांविषयीच्या तक्रारींबाबत प्रशासनाचे गांभीर्य कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तात्पुरती डागडुजी केलेले रस्ते पूर्ववत चांगले करण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पावसाळ्यामध्ये शहरातील जुन्या रस्त्यांबरोबर नुकतेच केलेल्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर यंत्रणा राबविली गेली, खड्ड्यांची तक्रार आल्यानंतर ते २४ तासांच्या आत बुजविण्याची व्यवस्था उभारण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या. मात्र पावसाळा संपताच खड्ड्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मोबाइल अ‍ॅप, महापालिकेचे संकेतस्थळ यांसह ट्विटर, फेसबुकवरूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्याच्या काळात महापालिकेकडे महिन्याला सरासरी १५० खड्ड्यांच्या तक्रारी येत होत्या. आॅक्टोबर महिन्यात तक्रारींचे हे प्रमाण ७० इतके होते. मात्र तक्रार केल्यानंतर पूर्वी ज्या वेगाने २४ तासांच्या आत खड्डे बुजविले जात होते, तितक्या वेगाने आता कार्यवाही होताना दिसून येत नाही. सध्या खड्ड्यांच्या २६ तक्रारी प्रलंबित आहेत. सातारा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, पावसाळ्यात ते बुजविण्यात आले. मात्र, तात्पुरत्या डागडुजीनंतर ते पुन्हा उखडले गेले आहेत. स्वारगेट चौकामध्ये उड्डाणपुलाच्या बाजूला खड्डे बुजविण्यासाठी टाकलेले डांबर निघून गेल्याने पुन्हा खड्डे उघडे पडल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमधील पेठ परिसरामध्येही ठिकठिकाणी रस्ते उखडले गेले आहेत. उपनगरांमधील रस्त्यांची परिस्थिती आणखीनच वाईट आहे.(प्रतिनिधी)>खडडे बुजविण्यासाठी सध्या ४ मोबाइल व्हॅन कार्यान्वित असून येत्या २ महिन्यात आणखी ८ मोबाइल व्हॅन कार्यान्वित होणार आहे. सध्या खडयांच्या तक्रारी मात्र खुपच कमी झाल्या आहेत.- राजेंद्र राऊत, पथ विभाग प्रमुख >खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबितशहरामध्ये मोबाइल, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून सेवावाहिनी टाकण्यासाठी केल्या जात असलेल्या खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था होते. या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. मात्र, स्थायी समितीकडून दोन महिने उलटले तरी त्याला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. शहरात पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्याचे कंपन्यांचे नियोजन आहे, त्यामुळे पुन्हा आणखी खड्ड्यांचा करावा लागणार आहे.>मणक्याच्या आजाराला आमंत्रणखड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीच्या तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत. सकाळी व संध्याकाळच्या वेळी वाहतूककोंडीबरोबर खड्डे चुकविण्याचीही मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे तात्पुरत्या डागडुजी केलेल्या खड्ड्यांची योग्यप्रकारे दुरुस्ती केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.