शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मराठेतर उमेदवारांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यास स्थगिती; रिक्त पदांवर कोणाचीही नियुक्ती नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 06:36 IST

हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पाच वर्षांत सरकारी सेवांमध्ये आरक्षित पदांवर केल्या गेलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांच्या सर्व ‘तात्पुरत्या’ नियुक्त्या रद्द करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. या अंतरिम स्थगितीमुळे सुमारे २ हजार मराठेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. सरकारी विभागांतील ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. या रिक्त पदांवर कोणाचीही नियुक्ती करू नका, असेही निर्देश न्या. रणजीत मोरे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले.

मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती लागू असताना पाच वर्षांत सरकारी सेवांमध्ये या पदांवरील सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांच्या सर्व ‘तात्पुरत्या’ नियुक्त्या रद्द करून त्या पदांवर आरक्षणानुसार मराठा समाजातील उमेदवार नेमण्याबाबत ११ जुलै रोजी सरकारने अधिसूचना काढली. याला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारच्या अधिसूचनेवर ‘जैसे-थे’ ठेवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी ठेवली. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सरकारने मराठा समाजास शिक्षण व सरकारी नोकºयांत आरक्षण देण्याचा कायदा केला. राज्य सरकारने २०१४ मध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी सिव्हिल इंजिनीअर व हेल्थ वर्कर्स या क्षेत्रांत काही जागा आरक्षित ठेवल्या. मात्र, त्या जागा भरू शकले नाही. कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले. न्यायालयाने ७ एप्रिल २०१५ रोजी या निर्णयास स्थगिती दिली. त्यानंतर सरकारने मराठेतर उमेदवारांची या जागांवर तात्पुरती नियुक्ती करताना त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील, नियुक्तीपत्रांवर नमूद केले होते.‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशजूनमध्ये उच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे मान्य करत राज्य सरकारचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय योग्य ठरविला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारने आरक्षित पदांवर केलेल्या तात्पुरत्या नियुक्त्या रद्द करून त्या मराठा समाजातील उमेदवारांना देण्यासंबंधी अधिसूचना काढली. याच अधिसूचनेला उच्च न्यायालयाने ‘जैसे-थे’ ठेवण्याचा निर्देश दिला.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय