शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

तीन जिल्हा सहकारी बँकांचा परवाना अर्ज फेटाळण्याच्या आदेशावर स्थगनादेश

By admin | Updated: May 31, 2014 00:53 IST

नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा बँकिंग परवाना अर्ज फेटाळण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावर व बँकिंग व्यवहार थांबविण्याच्या निर्देशावर मुंबई उच्च

हायकोर्ट : नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्हा सहकारी बँकांचा समावेशनागपूर : नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा बँकिंग परवाना अर्ज  फेटाळण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावर व बँकिंग व्यवहार थांबविण्याच्या  निर्देशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. यामुळे तिन्ही  बँकांसाठी शेतकर्‍यांना कर्ज व कर्मचार्‍यांना वेतन वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तिन्ही बँकांनी दाखल केलेल्या वेगवेगळ्या रिट याचिकांवर आज, शुक्रवारी अवकाशकालीन  न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तिन्ही बँकांची समस्या जवळपास समान असून  त्यांनी बँकिंग परवान्यासाठी केलेले अर्ज रिझर्व्ह बँकेने फेटाळून अवसायक नियुक्त होईपर्यंत  बँकिंग व्यवहार थांबविण्याचे निर्देश दिले होते. याचिकांमध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सचिव,  रिझर्व्ह बँक नागपूरचे कार्यकारी संचालक, राज्य शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे  सचिव आणि सहकार आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.  नागपूर जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेच्या याचिकेनुसार, या बँकेची १९११ मध्ये स्थापना करण्यात आली असून ही नागपूर  जिल्ह्यातील आघाडीची सहकारी बँक आहे. नागपूर बँकेने ‘बँकिंग रेग्युलेशन अँक्ट-१९४९’  अंतर्गत बँकिंग परवान्यासाठी अर्ज केला होता. परंतु, रिझर्व्ह बँकेने अर्ज विचारात घेतला नाही.  यामुळे नागपूर बँक नेहमीप्रमाणे कार्य करीत  होती. फायनान्स सेक्टर अँसेसमेंट कमिटीचे अध्यक्ष  राकेश मोहन यांनी परवाना नसलेल्या बँक कार्यरत राहू शकत नसल्याची शिफारस केल्यामुळे   यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ९ मे २0१२ रोजी बँक कायद्याच्या कलम  ३५-ए अन्वये नागपूर बँकेला नोटीस जारी करण्यात आली. त्यावर नागपूर बँकेने १७  मे व २८ मे  २0१२ रोजी उत्तर सादर केले. त्यात बँक कायद्याच्या कलम ३५-ए अन्वये लादण्यात आलेली  बंधने अन्यायकारक असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. परंतु, रिझर्व्ह बँकेने  त्याकडे दुर्लक्ष केले. (प्रतिनिधी)