शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

By admin | Updated: June 11, 2016 02:21 IST

ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. जेणेकरून, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा व्हावी यासाठी पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे आज उद्घाटन करण्यात आले. तसेच नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथेही करण्यात आले आहे. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करायला मंत्रिमंडळाने १ जून २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ‘माय गव्ह’ वेबसाइटवर लोगो डिझाइन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्राची स्थापनाई-कॉमर्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता परळ येथे एक समर्पित यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे, असेही दास म्हणाले. १२ हजार चौरस फुटांवर विस्तारलेल्या या केंद्राची दररोज ३० हजार पार्सल इतकी क्षमता आहे. याशिवाय महाराष्ट्र टपाल विभागाने ऐरोली येथे ४ हजार चौरस मीटर क्षेत्रावर ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. तसेच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विभागाकडून ई-कॉमर्स, स्पीड पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, मीडिया पोस्ट, बिझनेस पोस्ट, बिल मेल सेवा, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट आणि डायरेक्ट पोस्ट आदी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महसुलात वाढव्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक या माध्यमातून सरकारला २०१५-१६ मध्ये एकूण १६७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचा एकूण टपाल कार्यान्वयन महसूल ९५३ कोटी रुपये इतका आहे, असे दास यांनी या वेळी सांगितले.