शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तंबाखूविरोधी मोहिमेची ‘पोस्टर गर्ल’ हरपली!

By admin | Updated: April 2, 2015 05:12 IST

सिनेमा पाहायला जावे किंवा घरी टीव्ही लावावा. आता चांगला कार्यक्रम लावू, असे मनामध्ये चालू असताना अचानक एक जाहिरात लागायची. ही जाहिरात पाहून अनेकांनी डोळे बंद करून घेतले

मुंबई : सिनेमा पाहायला जावे किंवा घरी टीव्ही लावावा. आता चांगला कार्यक्रम लावू, असे मनामध्ये चालू असताना अचानक एक जाहिरात लागायची. ही जाहिरात पाहून अनेकांनी डोळे बंद करून घेतले असतील किंवा मान फिरवली असेल. कारण या जाहिरातीत विद्रूप चेहरा झालेली मुलगी दिसायची आणि तंबाखूमुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असा आवाज ऐकू यायचा. मुखाच्या कर्करोग झालेल्या मध्य प्रदेशातील सुनीता तोमरने तंबाखूविरोधी मोहिमेचा चेहरा होण्याचे धाडसी पाऊल उचलले होते. याच सुनीताचा आज १ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता मृत्यू झाला. सुनीता २८ वर्षांची होती. वयाच्या बाविसाव्या वर्षी तिला तंबाखू खाण्याची सवय लागली. जुलै २०१३ ला सुनीता जेव्हा मुंबईच्या टाटा रुग्णालयात उपचारासाठी आली, तेव्हा तिला चौथ्या स्टेजचा मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सुनीतावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. टाटा रुग्णालयात उपचार घेत असताना बाह्यरुग्ण विभाग, वॉर्डमध्ये असणारे रुग्ण पाहून तिचे मन हेलावून गेले होते. २०१४ साली तंबाखूविरोधी अभियानाची ती पोस्टर गर्ल म्हणून निवडली गेली. भारतात ही जाहिरात १७ भाषांमध्ये विविध वाहिन्यांवर आणि विविध सिनेमागृहांमध्येही दाखविली गेली.सुनीताचा कर्करोग काही प्रमाणात बरा झाला  होता, मात्र तरीही तो नव्याने परतण्याची शक्यताही होतीच. तसेच झाले आणि तिचा कर्करोग बळावला. तिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयामध्ये तब्येत खालावल्यावर भरती केले, तेव्हा तिला श्वसनाचा त्रास होता, तसेच तिचे वजनही मोठ्या प्रमाणात कमी झाले होते, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.पंतप्रधानांना लिहिलेले पत्र... दोन दिवसांपूर्वीच सुनीता हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तंबाखूविरोधी अभियानासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. खासदार दिलीप गांधी यांनी कर्करोग हा फक्त तंबाखू खाण्यानेच होत नाही. यासंदर्भातील सर्व सर्वेक्षणे परदेशात झाली आहेत. भारतात तेंदूपत्ता व विडी उद्योगावर चार कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे, असेही त्यांनी यासंदर्भात सांगितले होते. १ एप्रिलपासून तंबाखू उत्पादनांवरील धोक्याची सूचना देणारी चित्रे त्याच्या वेष्टनाचा ८५ टक्के आकार व्यापतील, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावर स्थगिती आणण्यात आली.खा. दिलीप गांधी यांच्या मतावर पंतप्रधानांना कळविताना सुनीताने लिहिले होते, की जेव्हा मी तंबाखू खायला सुरुवात केली तेव्हा माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे वाटले नव्हते़ मात्र इतरांना तरी याबाबत धोक्याची सूचना द्यायची, हे मी ठरविले आहे. आज कोणी तंबाखू खाताना दिसले तर ते मला सहन होत नाही. तंबाखूपासून तरुणांना लांब ठेवले पाहिजे, हेच माझे ध्येय आहे.