शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे दोन कोटींच्या १२ मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:55 IST

याबाबत १० मार्च रोजी सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. 

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात तिच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता आढळल्या. पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविलेल्या अहवालात या मालमत्तांचा उल्लेख आहे. याबाबत १० मार्च रोजी सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. 

वडील दिलीप खेडकर वर्ग एक अधिकारी असूनही पूजाने नॉन क्रिमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएस हे पद मिळवले. हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र  पाथर्डी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्तांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीप व आई मनोरमा खेडकरांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली. 

कुणाच्या नावावर काय? मनोरमा खेडकर यांच्या नावे ५ लाख ६० हजार, ४२ लाख २५ हजार, १ लाख ५ हजार अशा तीन मालमत्तांची नोंद असल्याचे सांगितले आहे. या तीनपैकी एका मालमत्तेचे बाजारमूल्य १४ लाख ६५ हजार असताना खरेदीखतामध्ये केवळ १ लाख ५ हजारांचाच उल्लेख करण्यात आला आहे. या तिन्ही मालमत्तांचे एकत्रित मूल्य ४८ लाख ९० हजार रुपये आहे. 

दिलीप खेडकर यांच्या नावे एकूण नऊ मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद आहे. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य १ कोटी ५६ लाख ९७, ५०० रुपये आहे.

अटक स्थगितीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीपूजा खेडकर हिच्या अटकेवरील स्थगिती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मंगळवार दि. १८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पूजाच्या अटकेवरील स्थगिती १७ मार्चपर्यंत वाढवली होती. त्यापूर्वी, १५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पूजाच्या अटकेला स्थगिती दिली होती.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी पूजाला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. पूजाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला सांगितले होते की, खेडकर तपासात सहकार्य करत आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा २३ डिसेंबर २०२४ चा आदेश रद्द केला होता. अटकपूर्व जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. १ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. याविरोधात पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.