शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकरचा वडिलांनी केला बचाव, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 14:49 IST

Pooja Khedkar News: एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे, असं विधान दिलीप खेडकर यांनी केलं आहे. 

नियुक्तीच्या ठिकाणी केलेल्या अवाजवी मागण्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांची पुण्याहून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचेही आदेश दिले गेले आहेत. तसेच पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनाही विविध चौकशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पूजा खेडकर यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी आपल्या मुलीचा बचाव केला आहे. एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. 

पूजा खेडकर यांच्याबाबत  सुरू असलेल्या वादाबाबत प्रतिक्रिया देताना पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर म्हणाले की, पूजा हिने नॉन क्रिमिलेअरमधून अर्ज केला होता की क्रिमीलेअरमधून या प्रश्नाचं उत्तर आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर देऊ. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही. आम्ही सारं काही नियमानुसार केलं आहे. तसेच त्यामध्ये काहीही चुकीचं  नाही आहे, असं ते म्हणाले.

दिलीप खेडकर पुढे म्हणाले की, याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडावी का, याबाबत आम्ही वकिलांशी सल्लामसलत करत आहोत. आमच्या मुलीला त्रास दिला जात आहे. तिच्याकडून कुठलीही चूक झालेली नाही. एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र