बाटली आणि झाकणात वापरला जाणारा पॉलिमरही चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:53 AM2019-08-28T05:53:10+5:302019-08-28T05:54:57+5:30

देशात प्लास्टिकचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे.

Polymers used in bottles and lids also dengerous | बाटली आणि झाकणात वापरला जाणारा पॉलिमरही चिंतेचा विषय

बाटली आणि झाकणात वापरला जाणारा पॉलिमरही चिंतेचा विषय

googlenewsNext

औरंगाबाद : पिण्याच्या पाण्यासाठीच्या बाटलीत आणि झाकणात वापरला जाणारा पोलिमरदेखील चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
या अहवालानुसार, देशात प्लास्टिकचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. एका अन्य अहवालानुसार १९५० पासून आतापर्यंत तब्बल ८३० कोटी टनापेक्षा अधिक प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत हा आकडा दुप्पटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जगाचा विचार केल्यास प्रत्येक मिनिटाला जवळपास १० लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात आणि या सर्व बाटल्या प्लास्टिकपासून बनविल्या जातात. या पाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकचे छोटे-छोटे कण आपल्या पोटात जात असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्लास्टिकचे हे कण केवळ बाटलीतूनच पाण्यात मिसळतात, असे नाही, तर पाऊस, कचरा, प्रदूषित पाण्यातून प्लास्टिकचे हे छोटे-छोटे कण आपल्या पाण्यात मिसळतात आणि ते पुढे शरिरात जातात.
या अहवालानुसार, १५० मायक्रोमीटर (केसाच्या जाडीइतके) पेक्षा मोठे मायक्रोप्लास्टिक माणसाच्या शरीरात जाण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. त्याचवेळी अगदीच छोटे मायक्रोप्लास्टिक कण किंवा नॅनो आकाराचे प्लास्टिक माणसाच्या पोटात शोषित केले जाऊ शकते. याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा डेटा मात्र पुरेसा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


मुंबई
08
हजार मेट्रिक टन इतका कचरा मुंबईत रोज निर्माण होतो. ज्यामध्ये २२५ ते २५० मेट्रिक टन प्लास्टिक असते. मुंबईत महिन्याला २५० कोटी लिटर बाटलीबंद पाण्याची विक्री होते, अशी माहिती जलतज्ज्ञ आणि पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार यांनी दिली.
कोल्हापूर
01
लाख पाण्याच्या बाटल्या जिल्ह्यात रोज विकल्या जातात. यात २० लिटर्सचे १५ हजार जार आणि उर्वरित १ ते २ लिटरच्या बाटल्या असतात. जिल्ह्यात या बाटल्यांच्या ३० कंपन्या आहेत. महापूरकाळात तर कोल्हापुरात रोज पाच लाख पाणी बाटल्यांची विक्री झाली. त्यात २० लिटर जारचे प्रमाण जास्त होते. शहरात रोज १९० टन कचरा निघतो. यात निव्वळ प्लास्टिकचा कचरा ९० टन असतो.
पुणे
2000
ते २,२०० मेट्रिक टन इतका कचरा पुण्यात दररोज जमा होतो. त्यापैकी साधारण २५० ते ३०० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा असतो. पुणे शहर व जिल्ह्यात दोनशेहून अधिक पॅकेजिंग वॉटर ड्रिंकिंग बाटल्यांच्या कंपन्या आहेत. शहरात दररोज प्लास्टिकच्या एक लिटर पाण्याचे ३५ ते ४० हजार बॉक्स विकले जातात. एका बॉक्समध्ये १२ बॉटल्स म्हणजे दररोज साधारण चार लाख ८० हजार बाटल्यांची विक्री होते. लग्नसराईत हे प्रमाण दुप्पट असते.

सोलापूर
80
हजार बाटल्यांची विक्री शहरात रोज होते. प्लास्टिकचा कचरा रोज दीड टन जमा होतो.


सातारा
20
हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात रोज विक्री होते. शहरात रोज निर्माण होणारा कचरा ७० ते ७५ टन असून, यात साडेतीन ते ४ टन कचरा प्लास्टिकचा असतो.
नागपूर
40
लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात दररोज १,२५० मेट्रिक टन कचरा निघतो. यात २,००० किलो कचरा प्लास्टिकचा असतो. दररोज किमान ५० ते ७० हजारच्या जवळपास पाणी बॉटल्स कचऱ्यात निघतात.
नगर
60
ते ६५ हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात दररोज विक्री होते. शहरात दररोज ६ ते ७ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो.
औरंगाबाद
ते सव्वालाख पाणी बाटल्यांची विक्री शहरात दररोज होते, असे व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी सांगितले.

गोवा
हजार लोकसंख्या पणजी महापालिका क्षेत्रात आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि पणजी राजधानी शहर असल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या दुप्पट पर्यटक येथे भेट देत असतात. पाण्याच्या बाटल्यांचा खप सुमारे २ टन एवढा असून महापालिका क्षेत्रात रोज सुमारे ७ टन सुका कचरा निर्माण होतो. त्यात सुमारे अडीच टन प्लास्टिकचा असतो.

Web Title: Polymers used in bottles and lids also dengerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.