शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 09:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. १ कोटी ५४ लाख मतदार गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण १६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल.

अमरावतीमध्ये रंगतदार लढतीची उत्सुकताअमरावती मतदारसंघात यावेळी मोठी रंगतदार लढत होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेल्या नवनीत राणा यांनी कवडे आव्हान दिले आहे. शेवटच्या टप्प्यात अडसुळांनी राणांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विकासाचे बोला, असे प्रत्युत्तर राणांनी दिले.

हिंगोलीतील विजयाचे गणित विसंबूनहिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत असून, वंचित आघाडी, बसपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित आहे.हेही उमेदवार रिंगणात : वंचित आघाडीचे मोहन राठोड, बसपाचे डॉ.दत्ता धनवे, आयूएमएलचे अल्ताफ अहमद, बीआरएसपीचे असदखान म.खान, पीआरपीचे उत्तम कांबळे, एएचपीचे उत्तम धाबे, बीएमपीच्या वर्षा देवसकर, एचबीपीचे सुभाष वानखेडे, बीएमपीचे सुभाष वानखेडे, अपक्ष अ.कदीर, त्रिशला कांबळे, गजानन भालेराव, जयवंता वानोळे, देवजी असोले, प्रकाश घुन्नर, म.अहेमद, अ‍ॅड.मारोतराव हुक्के, वसंत पाईकराव, सुनील इंगोले २आदी २८ उमेदवार रिंगणात आहेत.

सोलापुरात तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्षसोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.हेही उमेदवार रिंगणात : लोकसभा निवडणुकीत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वरील तीन प्रमुख उमेदवारांबरोबरच अर्जुन ओहळ, कृष्णा भिसे, विष्णू गायधनकर, व्यंकटेश स्वामी, अशोक उघडे, सुदर्शन खंदारे, अ‍ॅड. मनीषा कारंडे, मल्हारी पाटोळे, अ‍ॅड. विक्रम कसबे, श्रीमंत मस्के या उमेदवारांचा समावेश आहे. यातील सहा उमेदवार अपक्ष आहेत. सन २0१४ मध्ये १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात ११ अपक्ष उमेदवार होते, तसेच सन २00९ मध्ये १३ जण निवडणूक रिंगणात होते त्यात अपक्ष ७ होते.

नांदेड प्रतिष्ठेची लक्षवेधी लढतनांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असले, तरी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़हेही उमेदवार रिंगणात : नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत होत असली, तरी नोंदणीकृत राजकीय पक्षाचे अब्दुल रईस अहेमद, अब्दुल समद, मोहन वाघमारे, सुनील सोनसळे तर अपक्ष म्हणून श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजीत देशमुख, शिवानंद देशमुख हेही उमेदवार रिंगणात होते़ सर्वच उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला़

उस्मानाबादेत कौटुंबिक वादाची किनारउस्मानाबाद मतदारसंघात यावेळी १४ उमेदवार रिंगणात आहेत़ गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची जोरदार चुरस रंगली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे नात्याने चुलत भाऊ. मात्र, त्यांच्या कुटुंबातील वैर जगजाहीर आहे. निवडणूक प्रचारातही दिसून आले.हेही रिंगणात : प्रमुख दोघांसह वंचित आघाडीचे अर्जुन सलगर, बसपाचे डॉ़शिवाजी ओमन, आण्णासाहेब राठोड, दीपक ताटे, विश्वनाथ फुलसुरे, आर्यनराजे शिंदे, नेताजी गोरे, जगन्नाथ मुंडे, तुकाराम गंगावणे, वसंत मुंडे, शंकर गायकवाड, सय्यद सुलतान हेही रिंगणात आहेत़

लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे. शिवाय, या लढतीला मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकेका मतासाठी जिवाचे रान करत आहेत.हेही रिंगणात : वंचित आघाडीकडून राम गारकर, बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे रूपेश शंके, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे, रमेश कांबळे हे रिंगणात आहेत़

अकोल्यात नव्या विक्रमाची लढतअकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे. धोत्रे यांनी विजय मिळविला, तर अकोल्यातून सलग चौथ्यांदा जिंकणारे ते पहिलेच ठरतील. आंबेडकर जिंकले, तर काँग्रेससोबत आघाडी न करता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झाले, तर तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल.हेही उमेदवार रिंगणात : अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिगणात आहेत भाजपा, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून, बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाचे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून गजानन हरणे, मुरलीधर पवार, अरुण ठाकरे, प्रवीण कौरपुरीया, सचिन शर्मा हेदेखील रिंगणात आहेत.

बीडमध्ये मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणालाबीड लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे. शिवाय, या लढतीला मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वादाची किनार लाभल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.हेही उमेदवार रिंगणात : विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी), स. मुज्जमील स.जमील (सपा), अशोक थोरात (हम भारतीय पार्टी), कल्याण गुरव (भारतीय सुराज्य पक्ष), गणेश करांडे (महाराष्ट्र कांती सेना), रमेश गव्हाणे (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), चंद्रप्रकाश शिंदे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), सादेक मुनीरोद्दीन शेख (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) यांच्यासह २६ अपक्ष असे एकूण ३६ उमेदवार आहेत.

परभणीत खरी काँटे की टक्कर!परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. दोघेही तगडे उमेदवार असल्याने लढतीत चुरस आहे.हेही उमेदवार रिंगणात : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ़ वैजनाथ फड, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्यासह एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ या उमेदवारांनीही जोरदार प्रचार चालविला़ विशेषत: वंचित बहुजन आघाडीचे खान यांच्यासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा, पाथरीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपवर प्रखर टीका केली़

बुलडाण्यात युती-आघाडीत दुरंगी लढतबुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे. निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात होत आहे, हे दोन्ही नेते जिल्ह्यासाठी हेवीवेट आहेत.हेही उमेदवार आहेत रिंगणात : १७व्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १२ उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार, बसपाचे अब्दुल हफीज, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप पाटील आणि अपक्ष म्हणून अनंता पुरी, गजानन उत्तम शांताबाई, दिनकर सांबारे, प्रविण मोरे, वामनराव आखरे, भाई विकास प्रकाश नांदवे, विजय बनवारीलालजी मसानी हे सात जण निवडणूक रिंगणात उभे आहेत 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019hingoli-pcहिंगोलीnanded-pcनांदेडsolapur-pcसोलापूरparbhani-pcपरभणीbeed-pcबीडlatur-pcलातूरamravati-pcअमरावतीakola-pcअकोलाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९