शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९.६८ टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 17:04 IST

जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 : जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले. मतदार स्लीपा दुर्गम व ग्रामीण भागात न पोहल्याने मतदारांचा थोडासा गोंधळ उडाला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे. सकाळी साडेआकरा वाजेपर्यंत २५.८९ टक्के मतदान झाले होते. दुपारी दिड वाजेपर्र्यत ही टक्केवारी १३.७९ टक्क्यांनी वाढून ३९.६८ टक्के झाली. जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मदातर असून, यामध्ये १४ लाख ७0 हजार ५0 पुरुष तर १३ लाख २ हजार १८३ महिला मतदार आहेत. यात अन्य १२ मतदार आहेत. यापैैकी दुपारी दिड वाजेपर्र्यत ७ लाख ५३ हजार ५६७ पुरूषांनी तर ३ लाख ५४ हजार ५१७ महिला अशा ११ लाख ८ हजार८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषदच्या ७५ गटासाठी ३७५ तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. २ जिल्हा परिषद गट व ९ पंचायत समिती गणात थेट लढती होत असून उर्वरीत सर्व ठिकाणी बहुरंगी लढीत होत आहोत. निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचे वाटप केले आहे.

जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्या केंद्रावर केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २७ लाख ९२ हजरा मतदार स्लीपा वाटपाचे आवाहन जिल्हा प्रशासनावर होते. मात्र मतदान सुरू झाले तरी दुर्गम व डोंगरी भागात या स्लीपा पोहचल्याच नव्हत्या. मतदान यादीच नावे चुकीची होती. तर जन्या मतदार याद्या पाहून कागदावरच मतदान क्रमांक लिहून दिला जात असल्याने मतदान करताना गोंधळ उडत होता. या निडणुकीत नवमदरांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. या मदारांचे काही ठिकाणी गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान११.३0 पर्यंतटक्के : २५.८९पुरूष : ४ लाख ५५ हजार ६२३ महिला : २ लाख ६७ हजार ३७३एकूण : ७ लाख २२ हजार ९९६ १: ३0 पर्र्यतटक्के : ३९.६८ पुरूष : ७ लाख ५३ हजार ५६७ महिला : ३ लाख ५४ हजार ५१७ एकूण : ११ लाख ८ हजार ८४