शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सुडाचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही; खासदार सुप्रिया सुळे यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 07:55 IST

खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे.

नवी दिल्ली : ईडी व सीबीआय या यंत्रणांकडून महाराष्ट्रातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाया हा सुडाच्या राजकारणाचा भाग असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील ही संस्कृती नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाइकांच्या प्रतिष्ठांनावर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे. आजकाल पेन ड्राइव्ह बॉम्बची नवी फॅशन महाराष्ट्रात आली आहे. पहिले दोन पेन ड्राइव्ह बॉम्ब तर फुसके निघाले. इतरही तथाकथित पुराव्यांतून काहीही निष्पन्न होणार नाही.  महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभला आहे. महाविकास आघाडी ‘चोरांची’महाविकास आघाडीतील नेत्यांची आघाडी म्हणजे ‘चोर चोर मौसेरे भाई’ आहेत, अशा शब्दांत अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी ही नियमाने चालणारी संस्था आहे. कायदे हे सर्वांसाठी सारखे आहेत. पेन ड्राइव्हमध्ये पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्यास कुणाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. सामान्य लोकांसाठी जे कायदे आहेत. तेच कायदे इतरांसाठी असल्याचे खासदार राणा म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय