शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दुबार मतदारांवरून रंगला राजकीय वार-पलटवार; व्हाेट जिहादचा मुद्दा तापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:36 IST

मतदारसंघात दुबार मतदारांवरून कलगीतुरा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोणत्या मतदारसंघात किती मतदार दुबार आहेत, यावरून आता राज्याच्या राजकारणात 'धर्म'संकट आले आहे. कुठे हिंदू मतदार दुबार तर कुठे मुस्लिम मतदार दुबार यावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजपचे नेते आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही दुबार मतदार कुठे कुठे असल्याचे सांगितल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आता 'दुबार'चे युद्ध पेटले आहे.

राज ठाकरे यांना हिंदू आणि मराठी दुबार मतदार दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील मुस्लिमांची दुबार नावे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ‘व्होट जिहाद’ करत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली, असा आरोप मंत्री शेलार यांनी केला. त्यानंतर, सर्वच धर्माच्या मतदारांची दुबार नावे मतदार यादीतून वगळण्याची आमची मागणी असल्याचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज ठाकरे समाजांमध्ये भेदभाव करताहेत : शेलार

भाजप कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही. मात्र आघाडी आणि आता नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत. मविआच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघात मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि आमदारांचे मताधिक्य याची आकडेवारी सांगत अनेक आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का? असा सवाल करत शेलार यांनी राज ठाकरे आणि विरोधकांना लक्ष्य केले.

आशिष शेलारांकडून फुलटॉस : उद्धव ठाकरे

मी आज आशिष शेलार यांचे जाहीर अभिनंदन करतो. मतदार यादीत गोंधळ असल्याचे शेलार यांनीही सिद्ध केले असून त्यांनी आम्हाला फुलटॉस दिला आहे. आम्ही आयोगाकडे संपूर्ण मतदार यादीत सुधारणा मागतो आहोत, ठराविक कुठल्या यादीत नाही. शेलार यांनी लोकसभेपासूनचा मतदार यादीतील घोटाळा काढला. यांचे हे धाडस कौतुकास्पद असल्याचे सांगत सरकार तुमचे असताना विरोधक घोटाळा करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात, अशा शब्दांत ठाकरेंनी निशाणा साधला.

काँग्रेस, मनसेही मैदानात

भाजपला यातही हिंदू-मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. आम्ही जी दुबार मतदारांची यादी दाखवली त्यात हिंदूच मतदार आहेत इतर धर्माचे नाहीत हे शेलार कशाच्या आधारावर बोलतात? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरे