शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरने पोहोचविल्या पोलिंग पार्ट्या

By admin | Updated: October 15, 2014 01:36 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी

कडेकोट पोलीस बंदोबस्त : तीन मतदार संघात २०९ अतिसंवेदनशील मतदान केंद्रगडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून तीन विधानसभा क्षेत्रात ७३६ मतदान केंद्र राहणार आहेत. यापैकी २०९ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. सोमवारपासूनच मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ढगाळ वातावरण व पाऊसामुळे या कामात व्यत्यय आला. आज गडचिरोली, अहेरी व देसाईगंज मुख्यालयातून पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आल्या. अहेरी विधानसभा मतदार संघात दुर्गम गावातील मतदान केंद्रापर्यंत पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे काम हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आले आहे. मतदानाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. तीन विधानसभा मतदार संघात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार असून यामध्ये ३ लाख ७६ हजार ५० पुरूष व ३ लाख ५५ हजार ५५ महिला मतदार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात २२३, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २४७ व अहेरी विधानसभा मतदार संघात २६६ मतदान केंद्र राहणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी ४ हजार ५०० कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील भागातील ४६ मतदान केंद्र इतरत्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हलविण्यात आले आहे. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ६ व अहेरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३३ मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली विधानसभा मतदार संघात जवळजवळ २५ गावांनी पेसा कायदा लागू झाल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला आहे. आज राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या, खासगी वाहने, शासकीय वाहने तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्ट्या व सुरक्षा जवानांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले. संवेदनशील भागातील मतदान केंद्राची श्वान पथकाद्वारे तपासणी करून तसेच पोलिंग पार्ट्या जाण्यापूर्वी मार्गाचीही रोड ओपनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)