शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा सिटी बसमधील मोफत प्रवास आता बंद; वाहतूक भत्त्याचा पगारात केला समावेश

By नारायण जाधव | Updated: October 28, 2022 07:07 IST

गृह विभागाने ४ मार्च १९९१ रोजी विशेष आदेश काढून बेस्ट पुणे, सोलापूर, कोल्हापूर महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवासाची मुभा दिली होती.

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलासह राज्यातील सर्व पोलिसांना त्या त्या महापालिकांच्या शहर परिवहन सेवांमधून आता मोफत प्रवास करता येणार नाही. पोलिसांना देय असलेला वाहतूक भत्त्याचा आता त्यांच्या पगारात समावेश केल्याने गृह विभागाने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी विशेष आदेश काढून पोलिसांना महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवेश करता येणार नाही, याबाबतचे निर्देश दिले आहेत.

गृह विभागाने ४ मार्च १९९१ रोजी विशेष आदेश काढून बेस्ट पुणे, सोलापूर, कोल्हापूर महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवासाची मुभा दिली होती. कालांतराने ही सवलत नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, केडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालिकेची टीएमटीसह इतर महापालिकांच्या परिवहन सेवांनाही लागू करण्यात आली. या बदल्यात गृह विभाग त्या-त्या महापालिकेस दरवर्षी विशेष अनुदान देत असे.

... म्हणून सवलत बंद ■ मुंबईसह राज्यातील इतर महापालिका क्षेत्रातील बहुसंख्य पोलीस शासकीय वाहने किवा खासगी वाहनांनी कामावर जात •असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना रेल्वेसह परिवहन सेवांना अनुदान म्हणून देण्यात येत असलेला वाहतूक भत्ता आता एप्रिल २०२२ पासून पोलिसांच्या पगारात देण्याचा निर्णय घेतला आहे.■ यामुळे गृह विभागाने आता पोलिसांची सिटीमधील मोफत प्रवासाची सवलत बंद केली आहे. यामुळे हात दाखवून वाट्टेल तिथे बस थांबवून फुकट प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या मनमानीसही यामुळे आळा बसणार आहे. तसेच कंडक्टरकडून रीतसर तिकीट घेऊनच त्यांना सिटी बसमधून प्रवास करावा लागणार आहे.■ मुंबई महापालिकेची बेस्ट, नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, कॅडएमसीची केडीएमटी, ठाणे महापालिकेच्या टीएमटीसह राज्यातील कोणत्याच महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून पोलिसांना आता मोफत प्रवास करता येणार नाही.

टॅग्स :Policeपोलिस