सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : विनयभंग प्रकरणातील आरोपी रोहित झा याची जेलमधून सुटका होताच, त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढून पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजवला व फटाक्यांची आतषबाजी केल्याचे आता समोर येत आहे. यामुळे ‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’ची पोलिस यंत्रणेला न जुमानण्याची मुजोर प्रवृत्ती पुन्हा एकदा अनुभवास आली. वेबसिरीजमधील संतापजनक दृश्य वाटणाऱ्या या प्रकाराचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच्या माध्यमांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या; पण तरी पोलिसांनी झा किंवा त्याच्या साथीदारांनाना अद्याप अटक केलेली नाही. याप्रकरणी केवळ नऊपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राजकीय हत्याप्रकरणांमुळे महाराष्ट्रात गेली ३० वर्षे बदनाम असलेल्या उल्हासनगरात पोलिस यंत्रणेच्या याच भूमिकेमुळे गल्लोेगल्ली गुंड बोकाळल्याचे चित्र दिसून येते आहे.
त्यांना पोलिसी खाक्या दाखवायला हवा!उल्हासनगर कॅम्प नं. २ रमाबाई आंबेडकरनगर परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचेच राज्य आहे. २७ एप्रिल रोजी उघड्यावर दारू पिण्याच्या प्रकरणातून झा टोळीची विरोधी गटाशी हाणामारी झाली. यात विनयभंगाचा प्रकार घडला. यात दोन्ही गटांतील काही जणांना जेलची हवा खावी लागली. त्यापैकी रोहित झा याची १७ जुलै रोजी जेलमधून सुटका झाल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी परिसरात रॅली काढली. याप्रकरणी गुन्हा नोंदवायचा हा प्रश्न नाही; पण यंत्रणेला वाकुल्या दाखवणाऱ्या झाला पोलिसांनी इंगा दाखवायला हवा होता, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
दुसऱ्या गटाकडूनही फटाक्यांची आतषबाजीरोहित झा याची १७ जुलैला, तर विरोधी गटातील काही जणांची १६ जुलैला जेलमधून सुटका झाली. दुसऱ्या गटातील सहकाऱ्यांनीही फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचा बदला घेण्यासाठी झा यानेही दुसऱ्या दिवशी रॅली काढली. त्यामुळे आदल्या दिवशी निघालेल्या रॅलीचा व फटाक्यांचा व्हिडीओ पोलिस शोधत आहेत. तो हाती लागल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिले. त्यानंतरच दोन्ही गटांतील गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे ताम्हणे म्हणाले.