शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दखलपात्र गुन्ह्यांत एफआयआर नोंदविण्यास पोलीस बांधील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:37 IST

दखलपात्र गुन्हा असल्यास एफआयआर नोंदविण्यास पोलीस बांधील आहेत, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.

मुंबई : दखलपात्र गुन्हा असल्यास एफआयआर नोंदविण्यास पोलीस बांधील आहेत, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.प्रेमसंबंध तुटल्यानंतर बहुतांश मुली प्रियकराविरुद्ध बलात्काराच्या तक्रारी नोंदवितात. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी मागदर्शक तत्त्वे आखण्यात यावीत, अशी विनंती करणारी याचिका फिरोज खान यांनी अ‍ॅड. महेश वासवानी यांच्यातर्फे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने मंगळवारी न्या. भूषण गवई व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले.बलात्कारासंबंधित कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, लग्न करण्याचे आमिष दाखवून मुलीच्या संमतीनेच जर शारीरिक संबंध ठेवण्यात आले असतील, तर तो गुन्हा नाही, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कायद्यात अशी तरतूद असली तरी दखलपात्र गुन्ह्यांमध्ये प्राथमिक चौकशीसाठी एफआयआर नोंदविण्यास पोलीस बांधील आहेत, असे गृह विभागाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.एखाद्या सज्ञान महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले असतील, तर तो बलात्कार ठरत नाही, असे सुधारित कायद्यात म्हटले आहे.मात्र, अशा तक्रारी आल्यानंतर तक्रारदार महिलेने स्वखुशीने सहमती दिली होती की लग्नाचे आमिष दाखवून तिचे मन वळविण्यात आले, याचा तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.न्यायालयात अहवाल सादर करावादखलपात्र गुन्ह्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदविणे बंधनकारक आहे. तपासाअंती जर पोलिसांना तक्रारदाराने आरोपीवर केलेले आरोप खोटे आढळल्यास किंवा त्यात तथ्य नसल्याचे समजल्यास ते न्यायालयात तसा अहवाल सादर करून केस बंद करू शकतात. फौजदारी दंडसंहिता लक्षात घेता, काही केसेसमध्ये गुन्हा न नोंदविण्यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आखणे योग्य नाही. तरीही न्यायालयाने यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे असणे आवश्यक वाटत असेल तर त्यांनी संबंधित प्रशासनाला तसे निर्देश द्यावेत, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिस