शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी अचानक प्लान बदलला! फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार, जबाब नोंदवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:10 IST

आधी फडणवीसांना पोलीस ठाण्यात बोलावलं, पण आता पोलीसच फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार

मुंबई: गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्यानं मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दुपारी पत्रकार परिषद घेत सांगितलं. पोलिसांच्या सायबर सेलनं उद्या चौकशीसाठी बोलावलं असून मी त्यासाठी जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. फडणवीसांना बीकेसी पोलीस ठाण्यात बोलावलं जाणार नाही. त्याऐवजी पोलीस अधिकारीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी जातील, अशी माहिती समोर आली आहे. 

फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना बीकेसीतील पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. त्यासाठी आपण उद्या पोलीस ठाण्यात जबाब नोंदवू अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र आता पोलीस अधिकारीच फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. फडणवीस बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत. त्याऐवजी पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब घेणार आहेत. 

फडणवीसांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवण्यासंदर्भात गृहखात्यात बरीच चर्चा झाली. फडणवीस पोलीस ठाण्यात आल्यास भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीसांना पोलीस ठाण्यात न बोलावण्याचा निर्णय झाल्याचं समजतं.

फडणवीस यांना पोलीस ठाण्यात न बोलावण्यामागे काही राजकीय कारणंदेखील आहेत. फडणवीस पोलीस ठाण्यात गेल्यास तिथे भाजप कार्यकर्ते जमतील. त्यामुळे भाजपला शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळेल. याआधी भाजप नेते जेव्हा जेव्हा पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा तेव्हा पोलीस स्थानकाबाहेर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच पोलीस अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या निवासस्थानी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस