शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागण्याची परवानगी मागणारा पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:43 IST

पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

- जमीर काझीमुंबई - पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.माहीम येथील पोलीस वसाहतीत जाऊन त्यांच्यावर कारवाईचा आदेश बजाविण्यात आला. अहिरराव हे मूळचे धुळे येथील असून, २००५ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. सध्या मरोळ सशस्त्र दलात नियुक्तीला असलेले व मातोश्री येथे बंदोबस्तावर असलेल्या अहिरराव यांनी ८ मे रोजी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० ते २३ मार्च दरम्यान पत्नीचा पाय फॅ्रक्चर असल्याने रजेवर होतो.मात्र, पत्नीची प्रकृती खालावल्याने चार दिवस उशिरा २८ मार्चला कामावर हजर झालो. ५ दिवस गैरहजर राहिल्याने एप्रिल महिन्याचे वेतन काढले नाही. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यावर अतिरिक्त दंड बसत आहे. पत्नीचा उपचार, मुलीच्या शाळेचे शुल्क, आई आणि वडिलांचा खर्च भागविण्यासाठी किमान गणवेशात भीक मागण्याची परवानगी द्यावी.पोलीस खात्याची बदनामीकॉन्स्टेबल अहिरराव यांनी आपल्या समस्येबाबत वरिष्ठांना माहिती न देता अर्ज करून तो प्रसार माध्यमापर्यंत पोहोचविला. व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल केला. त्यांचे कृत्य शिस्तभंग करणारे आहे. गणवेशाचा अपमान करणारे असल्याने प्राथमिक चौकशीला अधीन ठेवून त्यांना निलंबित केले आहे. - वसंत जाधव, पोलीस उपायुक्त, मरोळ सशस्त्र दलतक्रार पूर्वीच केली होतीनिलंबन करण्याची कारवाई अन्यायकारक आहे. माझे वेतन थकविल्याबाबत मी ७ मे रोजी नियंत्रण कक्षातील ‘समाधान’ हेल्पलाइनवर तक्रार नोंदविली होती. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक (प्रशासन) चिखले यांना फोन करून हा प्रकार सांगितला होता. अर्ज दिल्यानंतर ९ मे रोजी उपायुक्तांनी माझ्याकडून वेतनाबाबत अर्ज लिहून घेऊन वेतनही काढले. अर्जाची प्रत मी प्रसार माध्यमाकडे पोहोचविलेली नाही.- ज्ञानेश्वर अहिररराव, निलंबित पोलीस कॉन्स्टेबल

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईnewsबातम्या