शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये; उच्च न्यायालयाने धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 00:55 IST

पत्रकार परिषद घेऊन पोलीस यंत्रणेने स्वत:चीच पाठ थोपटण्यात शहाणपण नाही. इतक्या संवेदनशील प्रकरणाची माहिती दररोज प्रसारमध्यमांना देण्यात येते. कोणाच्या सांगण्यावरून प्रसार माध्यमांना माहिती देण्यात येते?

मुंबई : पत्रकार परिषद घेऊन पोलीस यंत्रणेने स्वत:चीच पाठ थोपटण्यात शहाणपण नाही. इतक्या संवेदनशील प्रकरणाची माहिती दररोज प्रसारमध्यमांना देण्यात येते. कोणाच्या सांगण्यावरून प्रसार माध्यमांना माहिती देण्यात येते? या प्रकारामुळे तपासाला अडथळे येत आहेत, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले.डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, अशी मागणी करणारी याचिका दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी.पी. कुलबावाला यांच्या खंडपीठापुढे झाली. गेल्या शुक्रवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी पुण्याच्या काही पोलिसांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत न्यायालयाने म्हटले की, या पत्रकार परिषदेबाबत व यामध्ये दिलेल्या महितीबाबत खूपच चर्चा झाली. हा अतिउत्साह हानिकारक ठरू शकतो. संवेदनशील प्रकरणांत तेही तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पोलिसांनी प्रसारमाध्यमांकडे जाणे, हे शहाणपण नाही, असे न्यायालयाने म्हटले.दाभोलकर कुटुंबीयांनाही दिली समजआधीच्या तपासपासून माघार घेऊ नका. सर्व बाजूंनी तपास सुरू राहू द्या. अन्य आरोपींचाही यात सहभागआहे का? याचा तपास एसआयटीने करावा. दोन्ही खटले (दाभोलकर व पानसरे) वेगळे आहेत, असे म्हणत न्यायालयाने याचिकांवरील सुनावणी १० आॅक्टोबररोजी ठेवली.दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही न्यायालयाने समज दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन सतत प्रसारमाध्यमांसमोर जाऊन खटल्यासंबंधी पुरावे उघड करू नका, असे न्यायालयाने म्हटले आहे.काळेनेच अंदुरेला हत्येसाठी पुरवले पिस्तूलपुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्याकडून जप्त केलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवल्याची माहिती सीबीआयने सादर केलेल्या रिमांड रिपोर्टवरून न्यायालयात स्पष्ट झाली. या चौकशीसाठी काळे याला १४ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय