शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:58 IST

पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.

मुंबई : पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. नवी मुंबईचे बांधकाम व्यावसायिक सुनील लाहोरिया यांचा मुलगा संदीप लाहोरिया याचे काढलेले पोलीस संरक्षण परत देण्याचा आदेशही न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना दिला.कोणत्याही व्यक्तीची काहीही पार्श्वभूमी असली तरी त्याची बाजू ऐकून घेण्याचे कर्तव्य पोलिसांचे आहे. येथे लोकशाही आहे. हे मालदीव नाही, अशा शब्दांत न्या. भूषण गवई व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने नवी मुंबई आयुक्त हेमंत नागराळे यांना समज दिली.गेल्या सुनावणीत न्यायालयाने नागराळे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी चांगलीच खरडपट्टी काढली होती. संदीप लाहोरिया यांचे अचानक पोलीस संरक्षण काढल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नागराळे यांना त्यांची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले होते. मात्र नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे न ऐकताच न्यायालयाच्या आदेशाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. नागराळे संदीप यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागल्याचा दावा संदीप यांचे वकील तन्वीर निझाम यांनी केला. नागराळे व संदीप यांच्यातील रेकॉर्डेड संवादही त्यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर संतापत न्यायालयाने नागाराळे यांची पोलीस दलातील उर्वरित सेवा धोक्यात आणण्याचा संकेत देत न्यायालयाची माफी मागण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार, मंगळवारच्या सुनावणीत खुद्द हेमंत नागराळे न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी न्यायालयाची माफी मागितली. मात्र, नागराळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही त्रुटी असल्याने न्यायालयाने महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांना समन्स बजावले. त्यावर कुंभकोणी यांनी एखाद्या पोलिसाने असे बोलणे योग्य नसल्याचे म्हटले. लाहोरिया यांनी केलेल्या याचिकेनुसार, जानेवारीमध्ये नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना नोटीस बजावून पोलीस संरक्षण काढून घेतले होते.पोलीस संरक्षण परत देण्याचे निर्देश-‘गुन्हेगारांशी बोलण्याची पोलिसांची एक पद्धत असते. त्यामुळे हळूहळू ये इतरांशीही तशाच भाषेत बोलतात,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ‘असे असेल तर त्यांनी (पोलिसांनी) त्यांची वृत्ती बदलावी. लोकांची सेवा करण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे. व्यक्तीची पार्श्वभूमी न पाहता त्याची बाजू ऐकणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने संदीप लाहोरिया यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश हेमंत नागराळे यांना दिले.

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय