शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दारूच्या नशेत जाळल्या 27 गाड्या, पुणे जळीतकांडाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: July 9, 2017 13:49 IST

पुण्यातील पर्वती परिसरात काल रात्री 27 गाड्या आग लावून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - पुण्यातील पर्वती परिसरात काल रात्री 27 गाड्या आग लावून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  दिनेश ऊर्फ झब्ब्या हरी पाटील( वय 25) असे आरोपीचे नाव आहे.   हे सारे कृत्य त्याने केवळ दारूच्या नशेत केले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 
 
 पुण्यातील पार्वती परिसरात पोलीस चौकीजवळच हे जळीतकांड झाले. यामध्ये टेम्पो,दुचाकी व सायकल अशी एकूण 27 वाहने जाळून खाक झाली.  पार्वती परिसरात पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळ स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात उभा असलेल्या एका दुचाकीला दिनेशने नशेत पेटवले. गाडीने पेट घेताचा ती आग इतर गाड्यांनीही पकडली. या आगीत 1 टेम्पो, 24 दुचाकी व 2 सायकल जाळून खाक झाली. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली. पर्वती परिसरातील वस्त्यांमध्ये अरुंद वाट असल्याने तेथील रहिवाशांकडून आपली वाहने मैदानात  पार्क करून ठेवण्यात येत असतात.  पुण्यामध्ये सातत्याने वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
(पुणे - द्रुतगती मार्गावर प्रवाशाला मारहाण करुन लुटले) 
(पुणे मेट्रो पिंपरीपर्यंत नव्हे, निगडीपर्यंत हवी!)
(‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!)
 
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत. आग विझवलवी. मात्र तोपर्यंत ही वाहने जळून गेली होती. दरम्यान, अज्ञाताने ही आग लावल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला लगेच अटक केली आहे. पुण्यात आशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे. रात्रीची घटना ही पोलीस चौकीजवळच घडल्याने याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे लोन केवळ पुणेच नाही तर पिंपरी-चिंचवड परिसरातही पसरले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलून अशा विघातक गोष्टींवर  नियंत्रण आणणे गरचेचे आहे.