शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सवर पोलीस, आरटीओची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 13:19 IST

अधिक तिकीट दर आकारल्यास : संबंधित वाहतुकदारांवर कारवाई करणार..

ठळक मुद्देसण-उत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांकडून आकारले जातात दामदुप्पट पैसे

पुणे : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्सकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकीटदराच्या दीडपटीहून अधिक तिकीट दर आकारल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाणार आहे. सण-उत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दामदुप्पट पैसे आकारले जात होते. प्रवाशांची ही लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल २०१८ मध्ये निर्णय घेत त्यावर बंधने आणली. या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या बस तिकीट दराच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सला केवळ दीड पट तिकीट दर आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाते. सध्या दिवाळी सणामुळे बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस व आरटीओकडून नुकतीच खासगी ट्रॅव्हल वाहतुकदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह आरटीओ व वरिष्ठ अधिकारी, वाहतूकदार, चालक, व्यवस्थापक, बुकिंग एंजट आदी उपस्थित होते.  निश्चित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडूनही साध्या गणवेशात पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवासी पाठवून जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. ट्रॅव्हल बसेस पार्किंग होतात त्याठिकाणी प्रवाशांना पार्किंगची व्यवस्था असावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, वाहतुकीसाठी वॉर्डन असावेत, अशा सूचना दिल्यात. बसथांबल्यावर बसजवळ रिक्षाचे चालक किंवा त्यांचे एजंट प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध रिक्षाने प्रवासाची सक्ती करणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचनाही वाहतूकदारांना दिली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. .....

वाहतूक पोलिसांकडून हेल्पलाइनखासगी ट्रॅव्हल बसमध्ये जादा भाडे आकारले जात असल्यास थेट वाहतूक पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन दिली आहे. ........तक्रार करण्यासाठी...व्हाट्स अ‍ॅप क्रमांक - ८४११८००१००वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष - ०२०-२६६८५०००ट्विटर - @पुणे सिटी ट्रॅफिक 

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सfraudधोकेबाजीpassengerप्रवासी