ठाणे : पोलिस भरतीसाठी खोटी कागदपत्रे देऊन पोलिसांचीच दिशाभूल केल्याचा प्राकार जळगाव जिल्ह्यातील विरनेर गावत घडली आहे. समाधान पाटील असे या उमेदवाराचे नाव आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भरती प्रक्रीयेनंतर त्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीत त्याने गृहरक्षक दलाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळले होते.ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातर्फे १० जून २०१४ ला साकेत मैदानावर पोलीस भरतीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी विरनेर गावाहून आलेल्या समाधानने गृहरक्षक दलासाठी राखीव कोट्यातून भरतीचा अर्ज भरला. त्यासाठी त्याने जळगावच्या गृहरक्षक दलात १७ फेब्रुवारी २००७ पासून कार्यरत असल्याचे प्रमाणपत्रही जोडले होते. या प्रमाणपत्रावर जळगाव गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशकांची खोटी स्वाक्षरी केली होती. हे बनावट प्रमाणपत्र देऊन गृहरक्षक दलासाठी राखीव जागेतून पोलिस भरतीचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविद गंभीरे यांनी गुन्हा दाखल केलो. जळगावाच्या गृहरक्षक दलाकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यावेळीही हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
पोलीस भरतीसाठी फसवणूक
By admin | Updated: September 29, 2014 07:32 IST