यवतमाळ : दारूबंदी चळवळीत सक्रिय असलेल्या यवतमाळ तालुक्याच्या यावली (इजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड खूनप्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. महादेव गोविंदा टेकाम, हुसेन काशिनाथ आत्राम, शंकर विठोबा आंजीकर (आत्राम), सुदाम लक्ष्मण शिवणकर, भगवान लक्ष्मण शिवणकर, दिवाण गोविंदा आत्राम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पाटील खून; सहा जण अटकेत
By admin | Updated: July 5, 2015 01:43 IST