शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सुरक्षा विभागात पोलीस अधिकाऱ्यांची वयोमर्यादा निश्चित; गृहविभागाचा नवीन अध्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:00 IST

विशेष सुरक्षा विभाग घटक, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या नियुक्तीबाबत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

- चेतन घोगरेअमरावती : विशेष सुरक्षा विभाग घटक, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या नियुक्तीबाबत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ३५ वर्षांखालील पोलीस उपअधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या सेवेत उपलब्ध होऊ शकतात. परंतु, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस हवालदार व पोलीस नाईक या संवर्गात ३५ वर्षांखालील पोलीस अधिकारी व अंमलदार मिळणे अत्यंत कठीण झाले होते. यामुळे विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस नाईक ही पदे रिक्त राहत होती. परिणामी मनुष्यबळाअभावी ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे अधिकारी व अंमलदार विशेष सुरक्षा विभागात प्रतिनियुक्तीवर घ्यावे लागत होते. अपु-या मनुष्यबळामुळे वर्गीकृत संरक्षित व्यक्तींच्या संरक्षणासाठी पूर्ण संख्येने मनुष्यबळ विशेष सुरक्षा विभागाला पुरवता येत नव्हते.पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळण्याकरिता १२ ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळण्याकरिता किमान ९ ते १० वर्षे कालावधी लागतो. या कालावधीत पोलीस नाईक, पोलीस हवालदार वर्गातील अंमलदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त होते. यामुळे विशेष सुरक्षा विभागाला ३५ वर्षाखालील पोलीस नाईक, हवालदार  उपलब्ध होत नव्हते. याशिवाय ज्या पोलीस नाईक अंमलदाराचे ३५ पेक्षा कमी आहे, असे पोलीस नाईक वर्गातील सर्व अंमलदार विशेष सुरक्षा विभागात कर्तव्य बजावण्यास इच्छुक असतीलच असे नाही.  त्यामुळे विशेष सुरक्षा विभाग घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर नियुक्तीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या वयासंबंधी अटी-शर्तीमध्ये गृहविभागाकडून सुधारणा करण्यात आली आहे. 

प्रतिनियुक्तीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची नवीन वयोमर्यादाअधिकारी                   वयोमर्यादापोलीस उपअधीक्षक        - ३५ वर्षेपोलीस निरीक्षक        - ४५ वर्षेसहायक पोलीस निरीक्षक    - ४५ वर्षेपोलीस उपनिरीक्षक        - ३५ वर्षे 

कर्मचारी                  वयोमर्यादापोलीस हवालदार        - ४५ वर्षेपोलीस नाईक        - ४० वर्षेपोलीस शिपाई        - ३५ वर्षे

विशेष सुरक्षा विभागात निवड करते कोण? अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यासाठी गठित विशेष सुरक्षा विभागात निवडीसाठी अधिकारी कर्मचाºयांबाबत बक्षिसे, शिक्षा, विभागीय चौकशी व मानसिक संतुलन हे चार निकष तपासले जातात. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तांकडून त्यांची निवड केली जाते. यासाठी आॅनलाइन अर्ज मागविले जातात.

टॅग्स :Policeपोलिस