शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आमदार बंब यांनी दमबाजी केलेल्या पोलीस उपनिरीक्षकला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 13:57 IST

आमदार प्रशांत बंब यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता.

मुंबई  - गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या गंगापूर येथील भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरीक्षकला दमबाजी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी याच अधिकाऱ्यावर ३० हजार रुपयांची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

आमदार प्रशांत बंब यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. ज्यात, कार्यकर्त्याची गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेले प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली असल्याची चर्चा होती. त्यानंतर या प्रकरणावरून माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रशांत बंब म्हणाले होते की, हा पोलीस अधिकारी गाड्या पकडतो. मग पैसे घेऊन सोडून देतो, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्या पोलीस उपनिरीक्षकावर रागावलो होतो.

बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये याच अधिकाऱ्याला, एका व्यक्तीवर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच पंटरमार्फत स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. गजेंद्र इंगळे यांनी समीर पठाण या व्यक्तीकडे पैसे देण्याचे फिर्यादीस सांगितेले होते. इंगळेयांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मात्र पुन्हा बंब याच्या दमबाजीच्या व्हिडिओची चर्चा जिल्हात आणि पोलीस विभागता पुन्हा पाहायला मिळत आहे.