पोलीस-नक्षल चकमक

By Admin | Updated: May 14, 2016 02:19 IST2016-05-14T02:19:01+5:302016-05-14T02:19:01+5:30

एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत पोलीस मदत केंद्र कोटमीच्या सीमेतील कन्हाळगाव जंगल परिसरात शुक्रवारी पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली.

Police-Naxal flint | पोलीस-नक्षल चकमक

पोलीस-नक्षल चकमक

गडचिरोली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत पोलीस मदत केंद्र कोटमीच्या सीमेतील कन्हाळगाव जंगल परिसरात शुक्रवारी पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. काही वेळाने नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
कोटमी पोलीस पथक व सीआरपीएफ जवान संयुक्तपणे कन्हाळगाव जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पळून गेले. पोलिसांनी अज्ञात नक्षल्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून नक्षलविरोधी अभियान
तीव्र करण्यात आले आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Police-Naxal flint