शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: October 5, 2016 06:00 IST

विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले.

औरंगाबाद : विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्र्यांनी निवेदन स्वीकारायला स्वत: येथे यावे, असा आग्रह धरीत शिक्षकांनी सुरक्षाकडे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. तर शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या धुमश्चक्रीत २१ शिक्षकांसह ९ पोलीस जखमी झाले.

विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, अशी संस्थाचालक व शिक्षकांची मागणी होती. मात्र, शासनाने सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कृती समितीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

क्रांतीचौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शासनाविरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा आमखास मैदानातील जामा मशीद चौकात आला. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून मोर्चेकऱ्यांसाठी प्रशासनाने आमखास मैदानात थांबण्याची व्यवस्था केली. मात्र, आंदोलक शिक्षकांनी मैदानात जाण्यास नकार देत चक्क जामा मशीद चौकातच ठिय्या मांडत रास्ता रोको केला. शिक्षकांच्या पवित्र्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक कोलमडली. शिवाय, अन्य पक्ष- संघटनांचे मोर्चेही खोळंबले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. चिथावणीखोर भाषणाने भडका शिक्षकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर तेथे कुणीही उठून भाषणबाजी सुरू केली. सुरुवातीला अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत असलेल्या या मोर्चात अचानक काही जणांनी चिथावणीखोर भाषणे सुरू केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत येथून उठायचेच नाही. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी येथे येऊन आपले निवेदन स्वीकारावे, अन्यथा आपण धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषणबाजी आणि पोलिसांच्या दांडगाईने हा जमाव बिथरला. पोलीस हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यूशिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदार राहुल प्रकाश कांबळे (५३) यांचा सायंकाळी हदयविकाराने मृत्यू झाला. कांबळे हे मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी त्यांना औरंगाबादला ड्युटी देण्यात आली होती. जखमी शिक्षक व पोलिसांची नावे पोलीस कर्मचारी विशाल धोत्रे (रा. ठाणे), जी. आर. शेख (रा. औरंगाबाद), अब्दुल खालीद यांच्यासह नऊ जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनाही या वेळी दगड लागले. जखमी शिक्षकांमध्ये सचिन कदम, उषा कदम, खंडेराय जगदाळे, समाधान कोल्हे, अनिता चव्हाण, गजानन ढोले, नीलेश गरुड, गजानन गायकवाड, यादव शेळके, विनोद शेळके, वहीद शेख, विजय कव्हर, विश्वनाथ मुंडे, नवनाथ मंत्री, के. पी. पाटील, कन्हैया विसपुते, शिवाजी धन्वे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.