शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी एसीपी आणि भावी पती विरोधात दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 16:25 IST

एसीपी निपुंजे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर आता ज्या कॉन्स्टेबलबरोबर लग्न होणार होते त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे, दि. 7 - ठाण्यातील महिला पोलीस  कॉन्स्टेबलच्या आत्महत्ये प्रकरणी एसीपी निपुंजे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर आता ज्या कॉन्स्टेबलबरोबर लग्न होणार होते त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आठवडयाभरापूर्वीच निपुंजे ठाणे पोलीस मुख्यालयात रुजू झाले आहेत. 

ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका या  पोलीस कॉन्स्टेबलच्या  महिलेने बुधवारी दुपारी आत्महत्या केली. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या सारिका या २०१४ मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्या. प्रशिक्षणानंतर त्यांना ठाणे शहर आयुक्तालयातील मुख्यालयात नेमणूक मिळाली होती. दोन ते तीन सहकारी महिला कॉन्स्टेबलसमवेत कळव्यातील मनीषानगरमध्ये राहत होत्या. 

बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्यामुळे रात्री ९ पर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनास्थळी चिठ्ठीही मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा मृतदेह दिला जाणार आहे.

दिवाळीत होते लग्न-पोलिसांच्या माहितीनुसार सारिका आणि तिचा भावी पती घरातच होते. फोन आल्यामुळे तो बाहेर पडला. त्याच वेळी तिने घरात हा गळफास घेतला. फोन झाल्यानंतर त्याने खिडकीतून आत पाहिले, त्या वेळी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. अशी कोणती चर्चा झाली की, तो बाहेर गेल्यानंतर तिने इकडे आत्महत्या केली. या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचे दिवाळीत लग्न होते.